
नाशिक प्रतिनिधी : – गेल्या काही वर्षापासून विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पालकांनी शेकडो तक्रारी अर्ज शासकीय अधिकारी वर्गास वारंवार देऊन सुद्धा त्याची संबंधितांकडुन दखल घेतली जात नसल्याचे निदर्शनास येताच पालक संघर्ष समितीने उचलले टोकाचे पाऊल.

सविस्तर वृत असे, मराठा विद्या प्रसारक संस्था नाशिक च्या अभिनव बाल विकास मंदीर, जनता विद्यालय, व आदर्श शिशुविहार उत्तम नगर सिडको नाशिक, या तीनही शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे या संदर्भात पालकांनी गेल्या दोन वर्षांपासून शासनाला, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना व शिक्षणमंत्री यांना शेकडो निवेदन दिले परंतु, अद्यापपर्यंत संबंधित शिक्षण विभागाने या निवेदनाची दखल घेतली नाही परिणामी शाळेने मुलांना प्रवेशापासून वंचित ठेवल्याने पालक संघर्ष समितीचे महेश पाटील यांनी न्याय हक्कासाठी विद्यार्थ्यांसह

200 ते 300 पालक मालेगाव सोयगाव येथे शालेय शिक्षण मंत्री मान. दादा भुसे साहेब यांच्या निवाससमोर दि. १६ जून २०२५ रोजी पालकांनी चिमुकल्यांची शाळा भरविली असता, शालेय शिक्षण मंत्री मान. दादा भुसे साहेब यांनी पालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन पालकांना आश्वासित केले की, आम्ही उद्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून चौकशी समिती नेमून तुम्हाला त्वरित न्याय दिला जाईल व उद्या मुलांना शाळेत प्रवेश दिला जाईल, तरी कृपया आपण आंदोलन स्थगित करावे. पालकांनी मंत्री महोदयांच्या विनंतीला मान देऊ तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे श्री महेश पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

शिक्षण मंत्री यांस देण्यात आलेल्या निवेदनासोबत पालकांच्या मुख्य १४ मागण्याही देण्यात आल्या असून, येत्या आठ दिवसात पालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास सर्व पालक मुलांसह शाळेच्या बाहेर खूप मोठया प्रमाणात उपोषणास बसतील व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांवर राहिल अशी माहिती पालक संघर्ष समितीचे महेश पाटील, किरण गायकवाड, पुष्पेन्द्र महाजन, संदीप गांगुर्डे, सचिन देवरे, संगीता पाटील वैशाली सूर्यवंशी व संघर्ष समितीच्या पालकांनी दिली आहे.