
कोपरगाव : भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला.
प्रारंभी स्कूल कमिटी चेअरमन चंद्रकांत ठोळे संस्थेचे अध्यक्ष श्री कैलासचंदजी ठोळे सचिव श्री दिलीप अजमेरे सहसचिव सचिन अजमेरे विश्वस्त संदीप अजमेरे डॉक्टर अमोल अजमेरे आनंद ठोळे राजेश ठोळे व शाळेचे मुख्याध्यापक श्री मकरंद निमोणकर सर यांच्या हस्ते श्रीविठ्ठल – रुक्मिणी मूर्तीची पूजा व दीपप्रज्वलन करण्यात येऊन दिंडीला सुरुवात झाली.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान, संत जनाबाई, संत तुकाराम आदी संतांच्या वेशभूषेत सहभागी होत वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत केली. विद्यार्थ्यांनी टाळ- मृदुंगाच्या गजरात आकर्षक रिंगण पावल्या सादर केल्या तसेच भक्त पुंडलिकाच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
यानंतर भगवे ध्वज, गळ्यात टाळ, डोक्यावर तुळस घेऊन आणि श्री विठ्ठल-रुक्मिणींची पालखी खांद्यावर घेत विद्यार्थ्यांनी शहरातील विविध मार्गावरून पायी दिंडी काढत हरिनामाचा गजर केला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांचे योग्य ते मार्गदर्शन लाभले तसेच सौ अर्चना वाणी मॅडम यांनी सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला