Homeनाशिकनाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले जनतेला आवाहन

नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले जनतेला आवाहन

नाशिक प्रतिनिधी:- दिपावली हा देशभरात साजरा केला जाणारा सण असून, प्रत्येकाप्रती सण साजरा करण्याची उत्सुकता असते. अशावेळी जनतेला कायद्या व्यतिरिक्त कशाचीही व कोणाचीही भिती न बाळगता स्वछंदाने,आत्मविश्वासाने व मनमोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी कंबर कसली आहे.

नाशिक शहर हा कायद्याचा बालेकिल्ला असून तो कायमच राहणार आहे. या शहरात कोणीही भाई, दादा, बॉस, सरकार नाही. जर कोणी धमकावत असेल आणि अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर नाशिक सीपी व्हॉटस्अॅप क्रमांकावर (९९२३३२३३११) एक मेसेज पाठवा, त्याचा नाशिक पोलिसांकडून ‘योग्य’ तो बंदोबस्त केला जाईल आणि तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, याबाबत विश्वास बाळगावा. नाशिक शहराला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!