
कोपरगाव :- राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीचे औचित्य साधून परिट धोबी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष खडेराव कडलग व जिल्हाध्यक्ष यांचा आदेशानुसार व सर्व समाज बांधवांच्यावतीने परीट – धोबी सेवा मंडळ कोपरगाव शहरध्यक्षपदी श्री. नितीश अशोकराव बोरुडे यांची एक मताने निवड झाल्याबद्दल त्यांचा कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. राजेंद्रजी परजणे साहेब, भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष व माळी समाज अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष श्री. मुकुंद मामा काळे व संवत्सर ग्रामपंचायत मा. सदस्य श्री..महेश भाऊ परजणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

सदर प्रसंगी ह.भ.प.मिराताई वाकचौरे, भाजपा पुर्व मंडळ युवा मोर्चा सदस्य सचिन शेटे, संवत्सर ग्रामपंचायत मा. सदस्य तुषार बारहाते, दीनेश बोरनारे, राजेंद्र बोरनारे, परीमल कोद्रे, मोहन निकम साहेब, आकाश गायकवाड, गणेश गायकवाड, अरुण शिरसाठ, रवींद्र राऊत, अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्कारमुर्ती सत्काराला उत्तर देतांना म्हणाले कि, साधु संतांच्या पदस्पर्शाने पावन अशा कोपरगाव तालुक्याच्या भूमीमध्ये अनेक संत – महंतांनी सदैव आपल्या कृपाशिर्वादाने भाविकांना कृपांकृत केले असल्यानेच तमाम भक्त मंडळीं गुण्यागोविंदाने व आनंदीत राहतात. संत गाडगे महराजांनी दिलेला स्वच्छतेचा आणि समाजहिताचा वारसा पुढे नेण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन तसेच संत गाडगे महाराज मंदिर बांधकाम सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करीन शेवटी त्यांनी सर्वांचे आभार मानले.