Homeनाशिकसिन्नरएस. डी. जाधव इंग्लिश मिडीयम स्कूल, शहा विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत...

एस. डी. जाधव इंग्लिश मिडीयम स्कूल, शहा विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

सिन्नर प्रतिनिधी :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये एस. डी. जाधव इंग्लिश मिडीयम स्कूल, शहा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.१७ वर्षांखालील वयोगटातील तलवारबाजी स्पर्धेत कु. सम्राज्ञी संभाजी जाधव हिने उत्कृष्ट कामगिरी करत नंदुरबार येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.तसेच बॉक्सिंग स्पर्धेतील ७५ किलो वजन गटात कु.ऋत्विज खैरनार याने विजेतेपद पटकावत शिरपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

नाशिक जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम निकालात शाळेच्या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात साई कुलकर्णी याने तृतीय क्रमांक, आदित्य पोलगर याने तृतीय क्रमांक, तर १४ वर्षांखालील मुलांच्या गटात रौनक क्षत्रिय याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. संभाजी जाधव सर, उपाध्यक्षा सौ. शुभांगी जाधव मॅडम, प्राचार्य श्री. अतुल निळकंठ सर,क्रीडा शिक्षक श्री. निवृत्ती मुरडनर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!