HomeUncategorizedनाटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

नाटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

संपादक – राजेंद्र तासकर
संपूर्ण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीं ह्या कालबाह्य झाल्याने प्रत्येक ठिकाणी इमारतींचे डागडुजीचे कामे करण्यासाठी शासनाने परिपत्रक काढून निविदा मागविल्या होत्या,संबधित ठिकाणी ज्याप्रमाणे काम करणे असेल त्याप्रमाणे मटेरियल वापरण्यास बंधनकारक संबधित ठेकेदारास केले आहे व संबधित ठेकेदाने नियमानुसार मटेरियल वापरून काम पूर्ण करावयाचे आहे.
असे असतांना सुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे चित्र नाटेगाव येथील जि.प.प्रा. शाळेच्या इमारतीचे खराब झालेले पत्रे बदलण्याचे काम संबधित ठेकेदास दिले असून त्या ठिकाणी नविन कोटिंगचे पत्रे वापरण्याचे सदर निविदेत नमुद असतांना देखील संबधित ठेकदाराने कमी लेथ चा साधा पत्रा वापरून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला परंतु हि बाब खंडु मोरे,तुकाराम मोरे, प्रमोद मोरे,किरण कुदळे, जालिंदर उळेकर,जयवंत मोरे, सनी मोरे,जनार्दन मोरे,सदानंद मोरे,केशव मोरे,विलास मोरे, गणेश मोरे,रामनाथ मोरे,गोरख काळे,संदिप वाणी,सतिष मोरे, महेश मोरे या जागरूक ग्रामस्थांच्या लक्षात आली असता त्यांनी ते काम करण्यास संबधित ठेकेदारास हरकत करून नाटेगाव ग्रामपंचायत कार्यालयास लेखी अर्ज देऊन निविदेप्रमाणे शाळेच्या इमारतीचे काम ठेकेदाराकडुन पूर्ण करून घेण्याचे ग्रामसेवक, सरपंच व सर्व सदस्य यांना सूचविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!