

संपादक – राजेंद्र तासकर
सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा वायफळ खर्च टाळुन प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने चालू असलेले दिव्यांग भगिनीं सुनीताताई लोखंडे यांच्या घराच्या कामासाठी ५ ( पाच) पत्रा किट देण्यातआली.कोणताही वायफळ व अवाढव्य खर्च न करता सामाजिक बांधिलकिच्या जाणिवेतून हा उपक्रम श्रीरामपूर चे डी वाय एस पी संदीप मिटके साहेब तसेच तहसीलदार एफ. आर शेख साहेब,पी आय दराडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकरराव घाडगे यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे च्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.डी वाय एसपी संदीप मीटके साहेब यांनी या उपक्रमा बद्दल कौतुक केले तर पी आय दराडे साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि,दिव्यांग महिलेच्या घरासाठी मदत केल्याने चांगला आधार निर्माण होईल असे सामाजिक काम करणे गरजेचे आहे.तसेच तहसिलदार शेख साहेब आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि,असेच उपक्रम प्रत्येकाच्या वाढदिवसा निमित्ताने राबविल्यास वंचित दिव्यांगांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटेल आणि एकही दिव्यांग घरापासून वंचित रहाणार नाही. प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभाग घेऊन पुढे येण्याची गरज आहे.खूप चांगला उपक्रम राबवला अश्या सामाजिक कार्यकर्त्यांची आज वंचित घटकांना गरज आहे.
सत्कार मुर्ती बाळासाहेब जाधव म्हणाले कि,आमचे मित्र परिवार वाढदिवसाचे होर्डिग्ज बोर्ड लावण्याचा तयारीत होते परंतु प्रहार कार्यक्रमात मी दिव्यांग भगिनीं ला पत्रे देण्याचे कबूल केले होते त्याप्रमाणे माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी वायफळ खर्चाला आळा घालून माझ्या शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न केला याचप्रमाणे अनेकांनी असे उपक्रम राबवून समाजापुढे वेगळा पायंडा पडण्याची गरज आहे.
या उपक्रमासाठी रवी मोरे, पिंटूभाऊ साळवे,नीलेश जगधने, सचिन साळवे,मंदृभाई इनामदार, सतीश कवाने,पत्रकार अनिल कोळसे,पत्रकार मनीष पटेकर, मनोज साळवे यांचेही सहकार्य लाभले.याच दिवशी टाकळीमीयाँ प्रहार शाखाध्यक्ष नानासाहेब शिंदे महाराज,सुरेश दानवे,शाखाध्यक्ष भारत आढाव,विलास कोबरणे, विष्णु गुंजाळ, सुखदेव कीर्तने, यांचाही वाढदिवस असल्याने घरासाठी त्यांनीही मदत जाहीर केली.यावेळी प्रहार च्या महिला उपाध्यक्षा छायाताई हारदे, जगन्नाथ हापसे,तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी,राहुरी खुर्द शाखाध्यक्ष दत्ताभाऊ खेमनर, आदिनाथ दवणे महाराज व अनेक प्रहार दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले व शेवटीआभार प्रदर्शन सुरेशभाऊ दानवे यांनी मानले.