
संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव,
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.नामदार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने मा.तहसिलदार साहेब यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रहार दिव्यांगांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात संजय गाधी योजनेचे लाभ घेत असलेल्या लाभार्थीयांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करावी,त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिक, घटस्फ़ोटीत महिला,विधवा महिला,भूमीहीन असलेले लाभार्थी यांच्याकडे दारिद्र्यरेषेचा दाखला,पिवळे रेशन कार्ड नसेल यांना २१,०००हजाराचा उत्पन्नचा दाखला देण्यात यावा तसेच ज्या दिव्यांगाचे ऑफलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आहे अशा लाभार्थ्यांचे अनुदान थांबवावे किंवा बंद करण्यात यावे.ऑफलाईन दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्यां दिव्यांगांना ऑनलाईन प्रमाणपत्राची सक्ती करण्यात यावी,ज्यांचे ऑफलाईन प्रमाणपञ आहेत त्यांचे वेतन थांबवावे जेणे करून वशिल्याने काढलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढलेल्या लोकांना आळा बसून कमी होतील आणि खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा लाभ मिळेल व खरे लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही त्याचबरोबर शासनाच्या फसवणुकीला आळा बसेल. तसेच उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सर्कल चौकशी ही अट रद्द करण्यात यावी. त्याचप्रमाणे 40% पेक्षा जास्त दिव्यांग आहे यांना कोणतीही अट न लावता शासकीय योजनेचा लाभ देण्यात यावा,तसेच दि. 14/09/2020 रोजी राहुरी तालुक्यातुन जवळपास 250 दिव्यांगाचे अंत्योदय रेशन कार्ड योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेले आहे त्यामध्ये फक्त राहुरी शहरातील 70 दिव्यांगाना अंत्योदय रेशन कार्डचा लाभ देण्यात आला आहे इतर गावातील एकही दिव्यांगाला अंत्योदय योजनेत अद्याप समाविष्ट करण्यात आले नाही याची लवकरात लवकर दखल घेऊन दिव्यांगाना अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात यावे यासारख्या इतरही अनेक मागण्या निवेदनाद्वारे मा. तहसीलदार शेख साहेब यांच्याकडे दिलेल्या निवेदनात मांडण्यात आल्या होत्या.
मा.तहसिलदार शेख साहेब यांनी लगेचच दिव्यांगा बरोबर चर्चा केली. 31 जून पर्यंत सर्व लाभार्थीनी उत्पन्न दाखला देणे गरजेचं आहे यासाठी राहुरी तालुका प्रहार च्या वतीने एक शिबिराचे आयोजन करून एकाच वेळी सर्वांना उत्पन्नाचा दाखला देण्याचे नियोजन करण्यात येईल असे प्रकारचे आश्वासन दिले.
यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष वाडीतके साहेब,जिल्हा समन्वयक आपासाहेब ढोकणे,राहुरी तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे साहेब,राहुरी तालुका सल्लागार तथा देवळाली प्रवरा शहराध्यक्ष सलीमभाई शेख,राहुरी तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे,ब्राह्मणी शाखाध्यक्ष बाबुराव शिंदे,
राहुरी तालुका सचिव योगेश लबडे,संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी,राहुरी शहर उपाध्यक्ष जालिंदर भोसले,तालुका संघटक भास्कर दरंदरे,तालुका महिलाध्यक्षा सौ.रूपालीताई जाधव,महिला उपाध्यक्षा सौ. छायाताई हारदे,शहराध्यक्षा अनामिका हरेल,देवळाली प्रवरा शहर उपाध्यक्ष अनिल मोरे, सहसचिव सुखदेव कीर्तने, टाकळीमिया शाखाध्यक्ष ह.भ.प. नानासाहेब शिंदे,माहेगाव शाखाध्यक्ष भरत आढाव,
उपाध्यक्ष जगन्नाथ हापसे, गोटुबा आखाडा शाखाध्यक्ष दत्तात्रय खेमनर,शाखा उपाध्यक्ष आदिनाथ दवणे व अनेक दिव्यांग बांधव मोठया संस्थेने उपस्थित होते.