Homeनाशिकसिन्नरएस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के निकालाची...

एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

संपादक – राजेंद्र तासकर

कोपरगाव,
सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्रीकालभैरवनाथ शिक्षण संस्था संचलित एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम टिकविण्यात अग्रेसर असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री. निलकंठ ए.एस. सर यांनी दिली.

    संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. संभाजी जाधव सर यांनी दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या,त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त टक्केवारी मिळवलेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी पाच हजार रुपये बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांना मेहनतीने इथपर्यंत पोहचविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांचेही अभिनंदन करून आपल्या शाळेची गुणवत्ता अशीच टिकवून ठेवण्याचा मौखिक सल्लाही त्यांनी दिला.

शाळेचे सर्वच विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये पास झाले असून पहिल्या क्रमांकासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगली स्पर्धा बघण्यास मिळाली यापैकी खालील विद्यार्थ्यांनी बाजी मारली : -1)मनियार मुस्कान नसीर 93.40 % 2)बरकले अभिजीत पांडुरंग 92.20% 3)जाधव आशिष तुळशीराम 91.80% 3)कासार ओमकार सुनील 91.80% 4)जाधव अभिषेक प्रवीण 91.00% 4)फटांगरे प्रेम प्रवीण 91.00% 5)कासार देवयानी अजय 90.60% 5) कादरी माईस युनुस 90.60% 6)साबळे प्रतिक रतन 90.00%
यासह इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शाळेच्या सर्व शिक्षक -शिक्षिका,कर्मचारी यांनी अभिनंदन केले, त्याचबरोबर पंचक्रोशितुन त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!