HomeUncategorized" वसंतराव नाईक " गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविणाचे आव्हान दीपक आसेगांवकर अध्यक्ष...

” वसंतराव नाईक ” गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविणाचे आव्हान दीपक आसेगांवकर अध्यक्ष यांनी केले

महाराष्ट्र शासनाचा “डॉ.पंजाबराव देशमुख सर्वोच्च कृषिरत्न ” पुरस्कार प्राप्त संस्था

संपादक -राजेंद्र तासकर

हरितक्रांतीचे प्रणेते,भूमीपुत्र माजी.मुख्यमंत्री कै.वसंतरावजी नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी १८ऑगस्ट रोजी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक कर्तबगार शेतकऱ्यांचा तसेच कृषी शास्त्रज्ञांचा शाल, श्रीफळ,स्मृतिमानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्याची पुसदच्या वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानची सुदीर्घ अशी परंपरा आहे.
    १)विदर्भ,मराठवाडा,प. महाराष्ट्र,खांन्देश व कोकण अशा विभागातून विभागनिहाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन आणि अधिक नफा प्राप्त केला असल्यास आपला जीवनालेख(बायोडाटा)त्यामध्ये खर्च किती,उत्पादन(टनामध्ये) किती,व बाजारपेठेत विक्री केल्यानंतर निव्वळ नफा किती झाला याची सविस्तर माहीती पाठवावी.
 २)या वर्षी शास्त्रज्ञां करिता "तेलबिया(सोयाबीन,भुईमुग,तीळ,,सुर्यफूल,मोहरी) उत्पादन वाढीसाठी केलेल्या विशेष संशोधनात्मक कार्यासाठी " हा विषय निवडला आहे,ज्यांनी तेलबिया पिकामध्ये संशोधन करून नवीन जातीच्या बियाण्याची निर्मिती केली आणि त्यावर प्रात्यक्षिक करुन अधिक उत्पादन घेतले असेल अशा किंवा ३)शास्त्रज्ञांसाठी दुसरा विषय " हळद प्रक्रिया उद्योग यावर विशेष संशोधात्मक कार्यासाठी " हा विषय निवडला आहे अशा शास्त्रज्ञांनी त्यांचा जीवनालेख( बायोडाटा) आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा.
 खालील विषयावर कृषी क्षेत्राशी संबधीत विशेष पुरस्कार : -अ)कृषी क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणारी शेतकरी उत्पादक कंपनी,

ब)जोड व्यवसायातून कृषी पर्यटन.
वरील विषयावर कार्य करणाऱ्या शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी यांनी देखील सविस्तर माहीतीसह वरील सर्वांनी आपले प्रस्ताव १५ जुलै२०२२पर्यंत पोहचतील अशा पद्धतीने पाठवावे.
पत्र व्यवहारासाठी पत्ता : – कृषिभूषण दीपक आसेगांवकर. अध्यक्ष.वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान,पुसद,श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयासमोर,पुसद-४४५२०४जि.यवतमाळ.
भ्रमणध्वनी दीपक आसेगांवकर -९९२२५५२२२२,प्रा.अप्पाराव चिरडे -९४०४२३६२३६, उत्तमराव जाधव -७५८८०४३०३६, इमेल -vppusad@gmail.com येथे पाठवावे असे प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!