Homeकोपरगावपेट्रोल,डिझेलचे दर कमी करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय स्वागतार्ह -स्नेहलताताई कोल्हे

पेट्रोल,डिझेलचे दर कमी करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय स्वागतार्ह -स्नेहलताताई कोल्हे

संपादक – राजेंद्र तासकर

      राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत.भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्य सरकारने इंधन करकपातीचा निर्णय घेऊन जनतेला दिलेले वचन पूर्ण केले असून,सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे,अशी प्रतिक्रिया भाजपाच्या  प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. 
     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पेट्रोल आणि डिझेलच्या मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याची घोषणा केली होती.त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी (१४ जुलै) झालेल्या बैठकीत पेट्रोलवरील करात प्रतिलिटरला ५ रुपये तर डिझेलवरील करात प्रतिलिटरला ३ रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शिंदे-फडणवीस सरकारने हे निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला मोठी भेट दिली आहे.या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर तब्बल सहा हजार कोटींचा आर्थिक भार पडणार आहे.सरकारला आता पेट्रोल आणि डिझेलवरील 'व्हॅट'च्या माध्यमातून वर्षभरात ३१ हजार कोटींऐवजी २५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत.पेट्रोलवरील 'व्हॅट'मधून २ हजार ४०० कोटी, तर डिझेलच्या माध्यमातून मिळणाऱ्या 'व्हॅट'मधून ३ हजार ६०० कोटी रुपयांचा तोटा सरकारला सहन करावा लागणार आहे;परंतु शिंदे-फडणवीस सरकारने हा तोटा सहन करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा हा चांगला निर्णय घेतला असल्याचे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले. 
       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने २१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय घेतला होता.राज्य सरकारांनीआपापल्या राज्यांमधील मूल्यवर्धित करात कपात करावी,अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.भाजपशासित राज्यांनी मूल्यवर्धित करात कपात केली होती.मात्र,महाराष्ट्रासह काही बिगर भाजपशासित राज्यांनी करात कपात करण्याचे टाळले होते.मे महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी इंधन कपातीवरून बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या दिल्या होत्या.यापूर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना भाजपने पेट्रोल आणि डिझेलवरील कर ५० टक्के कमी करा,अशी मागणी वारंवार केली होती.पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे जनतेत तीव्र नाराजी होती.तरीही महाविकास आघाडी सरकार इंधनावरील करात कपात न करता केवळ केंद्र सरकारच्या नावाने ओरड करून आपली जबाबदारी झटकत होते;परंतु राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले आणि या सरकारने तातडीने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर येताच लगेचच हा निर्णय देऊन जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे.शिंदे-फडणवीस सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देत राज्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने काम करत आहे,असे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!