Homeकोपरगावजेऊर कुंभारी विविध कार्यकारी सोसायटीवर कोल्हे गटाचे वर्चस्व.

जेऊर कुंभारी विविध कार्यकारी सोसायटीवर कोल्हे गटाचे वर्चस्व.

संपादक – राजेंद्र तासकर

         तालुक्यातील जेऊर कुंभारी विविध सोसायटीच्या निवडणुकीत अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी  शेतकरी पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.
  या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखालील काळे गटाचा विरभद्र पॅनल वअहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांचा शेतकरी विकास पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली यात कोल्हे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने निवडणुकीत बाजी मारून १३पैकी १३ उमेदवार निवडून आणुन कोल्हे गटाने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले.
     यात ७०८ सभासद असुन ६४१ सभासदांनी मतदानचा हक्क बजावला.
        विजयी उमेदवारात सर्वश्री.गुरसळ परसराम पुंजाजी,चव्हाण आनंदा गोकुळ, चव्हाण दादासाहेब सखाहारी, जाधव अरविंद चिमाजी,पगारे तुळशीदास विठ्ठल,वक्ते कर्णासाहेब रामचंद्र,वक्तेकोंडीराम संपत,शिंदे सोने बापूरावजी,

देवकर बारकु दगु,बारसे संजय सुखदेव,गिरमे अरविंद लक्ष्मण, वक्ते सीना नवनाथ,शिंदे वैशाली विक्रम यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काम पाहीले,तर सहसचिव व सचिव आर एन राहणे यांनी मदत केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!