Homeकोपरगावसकाळ वृत्तपत्र समूहाच्या वतीने आज "आयडॉल ऑफ महाराष्ट्र" या पुरस्काराने माजी नगराध्यक्ष...

सकाळ वृत्तपत्र समूहाच्या वतीने आज “आयडॉल ऑफ महाराष्ट्र” या पुरस्काराने माजी नगराध्यक्ष मंगेश माधवराव पाटील सन्मानित

संपादक – राजेंद्र तासकर

            महाराष्ट्रात अग्रगण्य असणारे प्रसिद्ध असे नावाजलेले    सकाळ वृत्तपत्र समूहाच्या वतीने दिला जाणारा "आयडॉल ऑफ महाराष्ट्र " या पुरस्काराने माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना आज सन्मानित करण्यात आले.
        माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना मिळालेल्या आज पर्यंतच्या नगराध्यक्षांपैकी २००९मध्ये नगराध्यक्ष पदाचा सर्वात कमी काळ (साडेचार महिने फक्त )या मिळालेल्या नगराध्यपदाच्या संधीचे शहराच्या विकासाच्या दृष्टीने केलेले नियोजन व त्या दृष्टीने केलेली घोडदौड अतिशय कौतुकास्पद होती,शहरात पिण्याच्या पाण्यासाठी २५ एकर जागेत ५नं.साठवण तलाव, पाण्यासाठी उभारलेले जनआंदोलन,शहरात बाजरपेठ वाढीसाठी ११ एकर जागेचा आठवडे बाजार टर्मिनलसाठी आराखडा,शहरात काँक्रेट व डांबरी रस्ते,माँ जिजाऊ उद्यानाचे काम,अमरधामचा कायापालट, खुले नाट्यगृहाची दुरुस्ती,स्मारक,छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळे उभारणी व सुशोभीकरण यासारखी अनेक     असलेल्या सामाजिक कामाची दखल घेवून आयडॉल ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित केले त्याबद्दल सकाळ समूहाचे पाटील यांनीआभार मानले.
         कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाच्या आंदोलनात ज्या ज्या लोकांनी,संघटनांनी,विविध वृत्तपत्र,न्यूज चॅनेल,पत्रकार बांधव,पक्ष विरहित जाती निहाय पुढे येऊन,माता भगिनींनी सक्रिय सहभाग घेतला,त्या सर्व नागरिकांचे पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानून   अभिनंदन केले आणि म्हटले की, पाण्याचे श्रेय हे खरे सर्व एकत्रीत जनतेच्या व पाणी संघर्ष समितीचा लढयाचेआहे.
       पाटील पुढे म्हणाले की,  येसगाव येथील २५ एकर जागेतील ५ नंबर साठवण तळ्यांचे काम झाल्याशिवाय कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटणार नाही.मा.आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी मात्र ही गोस्ट गांभीर्याने लक्षात घेवून,त्याचा पाठपुरावा करून तब्बल १३१ कोटी निधी मंजूर करून आणला.त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार.
     सकाळ वृत्तपत्र समूहाच्या वतीने आज "आयडॉल ऑफ महाराष्ट्र" या पुरस्काराने माजी. नगराध्यक्ष मंगेश माधवराव पाटील यांना सन्मानित करताना राज्याचे आदर्शगाव संकल्प व कृती समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री मा.पोपटराव पवार,समवेत  विशेष पोलीस महानिरीक्षक ( नाशिक परिक्षेत्र) मा.डॉ.बी. जी.शेखर,प्रसिद्ध अभिनेते मा. मिलिंद शिंदे,जिल्हा पोलीस अधीक्षक मा.मनोज पाटील, अहमदनगर महापालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे,सकाळचे नगर आवृत्तीचे संपादक प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!