
मृत्युंजय तरूण मंडळ वारी येथील युवक कार्यकर्त्यांनी वारी ते वैष्णोदेवी पायी ज्योत यात्रेचे आयोजन केले असुन त्याचे स्वागत भाजपाच्या प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
संपादक – राजेंद्र तासकर
तालुक्यातील वारी येथील मृत्युंजय तरूण मंडळाचे युवक कार्यकर्त्यांनी वारी ते वैष्णोदेवी पायी ज्योत यात्रेचे आयोजन केले असुन त्याचे भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी साईबाबा कॉर्नर कोपरगांव येथे स्वागत केले.युवकांच्या या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले.
याप्रसंगी माजी सभापती मच्छिंद्र टेके,फकीर टेके,राजेंद्र मुरार,विशाल गोर्डे,अनंत टेके, गणेश सोळशे,रामभाउ वेताळ, गणेश भाटी,ज्ञानेश्वर मोरे,बाळु मुरार,डॉ सर्जेराव टेके,प्रशांत संत आदि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.