Homeकोपरगावभटक्या जनावरांना मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात घेऊन जाणार - अँड.नितीन पोळ

भटक्या जनावरांना मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात घेऊन जाणार – अँड.नितीन पोळ

संपादक – राजेंद्र तासकर

   कोपरगाव शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा सुळसुळाट झाला असून वारंवार सूचना देऊनही नगर पालिका ही समस्या सोडवायला तयार नाही त्यामुळे नगर पालिकेला कोणत्याही प्रकारे सूचना न देता ही भटके जनावरे नगर पालिका आवारात हुसकावून नेणार असा इशारा लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
  आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,कोपरगाव शहरात मुख्य रस्त्यावर गाढव,गायी,कुत्रे आणि डुक्कर यांचा सतत वावर असून ही मोकाट जनावरे शहरातील नागरिकांच्या मालकीची आहेत मात्र ते नागरिक ही जनावरे शहरात मोकाट सोडून देतात बऱ्याच वेळी ही जनावरे रस्त्यावर जमावाने बसून असतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो भटक्या कुत्र्यानी व डुकरांच्या दहशतीने अनेक लहान मुले व महिला वृद्ध यांना चावा घेतला आहे तर रस्त्यावर बसलेल्या गायी मुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत असतात कोपरगाव शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते,नागरिक यांनी अनेकदा या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे मात्र नगरपालिका प्रशासन या वर आजून तरी ठोस उपाय योजना करताना दिसत नाही  नगरपालिकेने अनेकदा फक्त या मोकाट जनावरांना पकडण्यासाठी नावाला टेंडर काढले होते मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती राहत आहे, 

रस्त्यावर वळूच्या झुंजीत अनेकदा महिला,वृद्ध,व बालके यांना त्रास होतो त्यामुळे मागील महिन्यात या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी तर दि २५/८/२०२२ रोजी गणेश चतुर्थीच्या आत या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती नगर पालिकेने त्या पत्राची कोणतीही दखल घेतली नाही विविध ठिकाणी श्री गणेश मंडळांनी गणपती बसवले आहे त्यामुळे शहरात नागरिकांची गर्दी वाढली आहे तसेच आता नागरिक गणपती मंडळाचे देखावे पहाण्यासाठी येतील मात्र रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर असल्याने अनेक गणेश भक्तांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यातून जनावरांच्या झुंजी मुळे एखादा अनर्थ घडण्याची शक्यता आहे नगर पालिकेला या गोष्टीचे गांभीर्य दिसत नाही त्यामुळे आता नगर पालिका प्रशासनाला कोणतीही पूर्व सूचना न देता ही मोकाट जनावरे एकत्र करून नगर पालिका मुख्याधिकारी यांच्या दालनात कोंडणार आहे असे या पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!