
गरिबाला कोणी वाली नाही असे म्हणतात ना त्याचा प्रत्यय नगर येथील महानगरपालिकेमध्ये पहावयास मिळाला.
संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
नगर येथील दिव्यांग प्रमिला राजू मनचे हे आपल्या कुटुंबाच्या उपजिवीकेसाठी गिरणी व्यवसाय चालू करण्यासाठी महानगरपालिकेकडुन परवानगी (लायसन्स )घेण्यासाठी चक्क सहा महिने महानगरपालिके मध्ये हेलपाटे मारून देखील त्यांना कोणी अधिकारी लायसन द्यायला तयार झाले नाही,शेवटी शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी पुढाकार घेऊन सदर दिव्यांगास अवघ्या काही दिवसांमध्ये गिरणीचे लायसन्स मिळवून दिले.एकंदरीतच महानगरपालिकेचा हा कारभार सर्वसामान्य व गोरगरिबांच्या बाबतीत कसा चालतो हे त्याचे ताजे उदाहरण म्हणावे लागेल.
सदर गिरणी मालक प्रमिला राजू मनचे यांना गिरणीचे प्रमाणपत्र नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड.लक्ष्मण पोकळे,पोपट शेळके, फारुख शेख,राजू मनचे,हमिद शेख, संजय पुंड,किशोर सुर्यवंशी आदि यावेळी उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य द्या असे प्रत्येक ठिकाणी सांगितले जाते परंतु महानगरपालिकेमध्ये त्याप्रमाणे दिव्यांगांना वागणुक मिळत नसल्याची खंत या प्रकरणास अनुसरून दिव्यांग व्यक्त करत आहे.
गेल्या सहा महिन्यापासून साधे गिरणीचे लायसन मिळवण्यासाठी या मनचे कुटुंबाने वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी केली असतांना देखील त्यांना वेगवेगळी कारणे देऊन उडावा - उडीवीची उत्तरे देऊन सुद्धा त्यांचा हा प्रकार थांबवला गेला नाही,अखेरीस शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना हस्तक्षेप करावा लागला.
सदर प्रकरण शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना समजताच त्यांनी तात्काळ या प्रकरणांकडे सर्वांचे लक्ष वेधले व काही दिवसातच गिरणीचे लायसन सदर दिव्यांग व्यक्तीस मिळवून देण्यात आले. त्याबद्दल प्रहार अपंग संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.