
कोपरगाव : -बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषद, अहिल्यानगर आणि उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गट निर्मित खाद्यपदार्थ वस्तुंचे विक्री व प्रदर्शनाचे आयोजन रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी सकाळी ११. ०० वा. तांबटकर मळा, गुलमोहर रोड, अहिल्यानगर या ठिकाणी करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे मा.ना.प्रा.राम शिंदे सभापती, विधानपरिषद,महाराष्ट्र राज्य आणि मा. ना. डॉ. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अहिल्यानगर यांच्या शुभहस्ते तसेच मा. खा.श्री. भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा सदस्य, शिर्डी, मा. खा. श्री. निलेश लंके लोकसभा सदस्य, अहिल्यानगर, मा. आ. श्री. किशोर दराडे विधानपरिषद सदस्य, मा. आ. श्री. शिवाजीराव गर्जे विधानपरिषद सदस्य, मा. आ. श्री. सत्यजीत सुधीर तांबे विधानपरिषद सदस्य, मा. आ. श्री. शिवाजीराव भानुदास कर्डिले विधानसभा सदस्य, राहुरी, मा. आ. श्रीम. मोनिका राजीव राजळे विधानसभा सदस्य, शेवगाव- पाथर्डी, मा. आ. श्री. संग्राम अरुणकाका जगताप विधानसभा सदस्य, अहिल्यानगर शहर, मा. आ .डॉ. किरण यमाजी लहामटे विधानसभा सदस्य, अकोले, मा. आ. श्री. आशुतोष अशोकराव काळे विधानसभा सदस्य, कोपरगाव, मा. आ. श्री. रोहित राजेंद्र पवार विधानसभा सदस्य, कर्जत- जामखेड, मा. आ. श्री. अमोल धोंडीराम खताळ विधानसभा सदस्य,संगमनेर, मा. आ. श्री. हेमंत भुजंगराव ओगले विधानसभा सदस्य, श्रीरामपुर, मा. आ. श्री. विठ्ठलराव वकीलराव लंघे विधानसभा सदस्य, नेवासा, मा. आ. श्री. काशिनाथ महादू दाते विधानसभा सदस्य, पारनेर, मा. आ. श्री. विक्रम बबनराव पाचपुते विधानसभा सदस्य, श्रीगोंदा, मा. श्री. प्रविण गेडाम (भा. प्र. से.) विभागीय आयुक्त, नाशिक, मा. श्री. डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, अहिल्यानगर, मा. श्री. आशिष येरेकर (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अहिल्यानगर, श्रीम. उज्वला बावके – कोळसे उपायुक्त विकास, नाशिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धाटन सोहळा संपन्न होणार आहे.

तरी बचत गटातील जास्तीत जास्त महिलांनी आपापल्या खाद्यपदार्थाचे विक्री स्टॉल लावून आपल्या पदार्थांची विक्री करून बचतीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. संभाजी लांगोरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर, श्री. राहुल शेळके प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अहिल्यानगर यांनी केले आहे.