

कोपरगाव : – अहमदनगर ( अहिल्यानगर ) येथील सेंट मोनिका अध्यापिका विद्यालयातील सन १९८१-८२ सालातील माजी विद्यार्थींनींचा स्नेह मेळावा शिर्डी येथे नुकताच संपन्न झाला.
साईनगरीतील हाॅटेल ” साईं सिमरण “च्या हाॅलमध्ये ‘सेंट मोनिका ट्रेनिंग’ (Ded) काॅलेजच्या मैत्रिणींची लगबग सुरू झाली .सकाळी लवकरच बहुतांश मैत्रिणी एकत्र जमल्या .प्रथम साईंबाबांच्या प्रतिमेला हार घालून उपस्थित मैत्रिणीं समवेत मनोभावे पुजारी दांपत्यांनी आरती केली.तद्नंतर प्रत्येकीने जुन्या आठवणींना उजाळा दिला .मजेदार किस्से ऐकून सगळ्यांजणी प्रसन्न झालया.तर काहीं भावूक मैत्रिणींचे आठवणीं सांगत असतांना डोळे पाणावले .
काहींनी आपल्या मनोगतात काॅलेजच्या काळात घेतलेल्या कष्टाचे त्यागाचे फलित म्हणून आज सुखी जीवन व्यतीत करत आहोत.असे सांगितले. तसेच सर्वांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.भरपूर गाणी तसेच मनसोक्त गप्पा मारल्या. आणि थोड्या वेळातच हाॅलचे मालक ‘डांगे ‘साहेब व त्यांचे सहकार्यांचे आभार मानून सर्व उपस्थित भगिनींना ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.उपस्थित सर्व मैत्रिणींचेही आभार व्यक्त केले. अर्थातच भेटीगाठी सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

नंतर मैत्रिणीं साईंबाबांच्या दर्शनासाठी मंदिरातकडे गेल्या मनोभावे दर्शन घेऊन लागलीच साईंबाबांच्या प्रसादाचा आस्वाद घेतला.आणि मनोमन सुखावलेल्या सर्व मैत्रिणींचा परतीचा प्रवास सुरू झाला.दिवस आजचा सुखाचा ,भाग्याचा !