Homeराहुरीआ. रवी राणा विरोधात राहुरी पोलिसात तक्रार

आ. रवी राणा विरोधात राहुरी पोलिसात तक्रार

मुब्य संपादक -राजेंद्र तासकर

             आमदार रवी राणा यांनी दिव्यांगाचे कैवारी माजी राज्यमंत्री आ. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या वरती ५-६ दिवसा पूर्वी केलेल्या गलिच्छ आरोपांविरोधात राहुरी पोलीस स्टेशनमध्ये,राहुरी तालुका प्रहार दिव्यांग सघटनेच्या वतीने तक्रार देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
 आ. रवी राणा यांनी माजी. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांनी शिंदे सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात गोवाहटीला जाऊन खोके घेतलेचा बिनबुडाचे आरोप गेल्या पाच सहा दिवसापूर्वी आपल्या भाषणार केला होता.त्याचा राहुरी तालुका प्रहार दिव्यांग सघटनेच्यावतीने जाहिर निषेध करण्यात आला. 
        बच्चुभाऊ यांनी 2012साली प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची स्थापना केली तेव्हा पासून दिव्यांगासाठी महाराष्ट्र भर विविध आंदोलने करून दिव्यांगासाठी 56शासन निर्णय सरकारला काढणे भाग पाडले तसेच 1995 च्या दिव्यांग कायद्याची खऱ्या अर्थाने अमलबजावनीस सुरवात झाली व तेव्हापासुन खऱ्या अर्थाने दिव्यांग स्वाभिमानाने जगण्यास चालना मिळाली त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकरी,शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्याचे काम बच्चुभाऊ यांनी केले.महाराष्ट्रातील दिव्यांग त्यांना देवासमान मानतात.अशा माणसावरील खोटे आरोप महाराष्ट्रातील दिव्यांग कदापि सहन करणार नाही असा इशारा राहुरी तालुका प्रहार दिव्यांग सघटनेचे मधुकर घाडगे यांनी केले. शिंदे - फडणवीस सरकारने अशा आमदाराची हकालपट्टी करावी अशी मागणीही आपल्या निवेदनात करण्यातआली आहे.
            यावेळी तालुका सल्लगार सलीम शेख,तालुका सचिव योगेश लबडे,तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, प्रहार सैनिक विष्णू ठोसर,सुखदेव कीर्तने आदि दिव्यांग उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!