
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परीक्षेत सिन्नर तालुक्यातील शहा येथील एस डी जाधव इंग्लिश मिडीयम स्कूलच्या 23 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता यात पैकीच्या पैकी सर्वच विद्यार्थी पास झाले व शाळेच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली.
यापैकी कु.सिध्दी विजय घुमरे, साक्षी विजय थोरात, सृष्टी विजय शेळके,अश्विनी तुळशीराम जाधव,ईश्वरी संजय शेळके,प्रीती विजय राऊत,श्रावणी विजय घुमरे,कू.स्वयम दत्तात्रय जाधव,या विद्यार्थ्यांनी A ग्रेड संपादन करून शाळेचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.संभाजी जाधव सर, सौ.शुभांगी जाधव व संस्थचे प्रिन्सिपॉल श्री.निळकंठ सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.संभाजी जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना आल्फ्रेड नोबेल याच्या जीवनातील प्रसंग सांगून आपल्यात असलेले कौशल्य समाजासाठी कसे उपयोगी पडेल याचा विचार करावा असा मोलाचा संदेश दिला व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.