Homeकोपरगावसहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उस वजन काटे अचूक

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उस वजन काटे अचूक

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

        सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उस वजन काटयाची अचानक तपासणी वजनमापे निरीक्षक भरारी पथकाने शुक्रवारी केली त्यात कोल्हे कारखान्याचे उस वजन काटे अचुक असल्याचा निष्कर्ष अहमदनगर येथील उपनियंत्रक वैध मापन शास्त्र व प्रादेशिक सहसंचालक अहमदनगरच्या प्रतिनिधींनी दिला आहे. 
        स्व.शंकरराव कोल्हे यांनी ६० वर्षांचा सभासदांचा जोपासलेला विश्वास या तपासणीने पुन्हा एकदा सार्थ ठरला आहे असे मत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केले.तसेच सर्वच ठिकाणी संगणकीकरण, पारदर्शकता व गतीमान प्रशासन हे उददीष्ट डोळया समोर ठेवुन नेहमीच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सभासदांची व उस उत्पादकांची विश्वासार्हता जपली आहे असे मत कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले आहे. 
      तसेच वजन काटयांचे थ्री डब्ल्यु डी प्रणालीचे कामकाज व ऑनलाईन पध्दतीने वजनकाटे जोडणारा अहमदनगर जिल्हयातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे पहिलाच सहकारी साखर कारखाना आहे असे मत भरारी पथकाच्या संबंधीत अधिका-यांनी व्यक्त केले व अशा प्रकारची संगणकप्रणाली सर्वच सहकारी व खाजगी कारखान्यांनी बसविली पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
      सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शुक्रवार १० फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथील वैधमापन शास्त्रचे उपनियंत्रक श्री.नि.प्र. उदमले,वैधमापन शास्त्र कोपरगांव विभागाचे निरीक्षक नंदकिशोर भावसार,प्रादेशिक सहसंचालक अहमदनगरचे प्रतिनिधी एस बी पवार आदिंनी उस वजन काटयाची तपासणी करून काटे योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले.याप्रसंगी कार्यकारी संचालक बाजीराव जी सुतार,केन मॅनेजर जी.बी.शिंदे,उस उत्पादक शेतकरी प्रतिनिधी शांताराम जायपत्रे,देवेश माळोदे,संदिप जामदार पंच म्हणुन उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!