
मुख्य संपादक-राजेंद्र तासकर
कोपरगांव शहरात ब्राह्यण सभा,कोपरगांव यांच्या ४० व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ब्राह्यण सभा,कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगांव शहरातील व पंचक्रोशीतील सर्व नागरीकांसाठी सर्व रोग निदान शिबिर शनिवार दि.२५ फेब्रुवारी २०२३ रोजी ब्राह्यण सभा मंगल कार्यालय,श्रीराम नगर,कोपरगांव येथे सकाळी ९.००वा.पासून ते दुपारी १वा.पर्यत आयोजित केले आहे अशी माहीती एस.जे.एस.हाॕस्पीटलचे कार्यकारी संचालक श्री.प्रसाद चांगदेव कातकडे आणि ब्राह्यण सभेचे सचिव श्री.सचिन देविदास महाजन यांनी दिली आहे.
या शिबिरांमध्ये बी.पी,शुगर, २ डी ई को,ईसीजी अशा अनेक इ.तपासणी करण्यात येणार असुन गरजुना मोफत औषधे वितरीत केली जाणार आहे.या शिबिरात अनुभवी तज्ञ डाॕक्टर प्राचार्य यांचे मार्गदर्शन व सल्ला आणि आवश्यकता भासल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.तरी या शिबिराचा गरजुं नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आसे आवाहन ब्राह्मण सभा,कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल यांनी केले आहे.