Homeकोपरगावप्रदिर्घ जुनाट कंटाळलेल्या आजारांवर सुप्रसाध आयुर्वेदिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कोळपेवाडी येथे मोफत तपासणी...

प्रदिर्घ जुनाट कंटाळलेल्या आजारांवर सुप्रसाध आयुर्वेदिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कोळपेवाडी येथे मोफत तपासणी शिबीर संपन्न

मुख्य संपादक – राजेंद्र तासकर

      तालुक्यातील कोळपेवाडी येथे डॉ.प्रकाश जे.कोळपे यांच्या संकल्पनेतुन प्रदिर्घ जुनाट व कंटाळा आलेल्या आजारांवर "सुप्रसाध"मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पंचकर्म व अॅक्युप्रेशर आयुर्वेदिक रविवार दि.१६एप्रिल२०२३ रोजी मोफत शिबीर संपन्न झाले त्यामध्ये ९० पेशंट तपासण्यात आले व ६० पेशंटवर उपचार करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
          ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकरी वर्गातील लोकांसाठी डॉ.प्रकाश जे.कोळपे यांच्या संकल्पनेतून डॉ.कोळपे नर्सिंग व फार्मसी कॉलेज जवळ,मढी रोड,कोळपेवाडी येथे गुडघेदुखी,कंबरदुखी,मानदुखी,संधिवात,मधुमेह,रक्तदाब, पॅरालिसीस,मणक्याचे गॅप,हाडांची झीज यां सारख्या अनेक आजाराने माणसाला आपल्या विळख्यात घेरले आहे.ठराविक वयानंतर नेहमी नेहमी सतावणाऱ्या प्रदिर्घ जुनाट आजारांवर रामबाण उपाय म्हणुन पंचकर्म व अँक्युप्रेशर याद्वारे माणसाला या आजारांतुन कायमस्वरूपी सुखरूप करण्याचे काम या पुढेही सदैव १० रुपये केस पेपर व ५० रुपये तपासणी फी मध्ये सुप्रसाध हॉस्पिटल कोळपेवाडी येथे केले जाणार आहे यांची तमाम ग्रासलेल्या पेशंटने नोंद घ्यावी.
     सदर शिबीर संपन्नतेसाठी डॉ.प्रकाश कोळपे,डॉ.धनंजय कोळपे,डॉ.गंगासागर कोळपे,डॉ.अतुल गायकवाड,डॉ.आशिष जऱ्हाड,डॉ.सारिका जऱ्हाड व सर्व स्टाप यांनी अथक परीश्रम घेतले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!