Homeकोपरगाववाचन चळवळीत ग्रंथालयांच योगदान महत्त्वाचे - सामाजिक कार्यकर्ते अरुण चंद्रे

वाचन चळवळीत ग्रंथालयांच योगदान महत्त्वाचे – सामाजिक कार्यकर्ते अरुण चंद्रे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

     वाचनाची चळवळ चालविली जात असताना ग्रंथालय, वाचनालय महत्वाची भूमिका बजावतात,महामान व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करणारी अनेक पुस्तके ज्ञानात भर घालतात.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र वाचन केले.त्यांच्या कार्याची ओळख करून घेऊन आपण शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आचरणात आणणे गरजेचे आहे'असे विचार कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाचे संचालक अरूण चंद्रे यांनी व्यक्त केले.
            कोपरगाव येथील स्व.र.म परिख हिंदी तथा मराठी सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.समारंभाच्या अध्यक्षस्थानी संचालक अरूण चंद्रे होते. स्वागत व प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष पदमकांत भाऊ कुदळे यांनी केले.मुंबई येथील जेष्ठ लेखिका सौ.भारती ताई सावंत यांना धुळे येथील कै.सौ.नलिनी प्रभाकर सुर्यवंशी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी देण्यात येणारा महिला गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल वाचनालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
       यावेळी माजी नगराध्यक्ष पदमकांत भाऊ कुदळे यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ नागरिक सेवा मंच,शब्द गंध साहित्यिक परीषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने व प्रा.राजेश मंजुळ,प्रा.धनंजय गायकवाड,प्रा.डॉ स्वप्नील बनकर,प्रा.महेश भागवत,प्रा.स्वप्ना कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.वाचनालयाचे वतीने जेष्ठ नागरिक वाचक विभुते नाना यांचा गौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला. 
       अभिवादन व सन्मान सोहळ्या निमित्त जेष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब,उत्तम भाई शहा,आशुतोष पटवर्धन,जेष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी, ग्रंथालयाच्या सौ.शोभना ठोळे,एड सौ गुजराथी,शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या स्वाती मुळे,अध्यक्ष कैलास साळगट, उपाध्यक्ष प्रा डॉ संजय दवंगे,साहित्यिक हेमचंद्र भवर,प्रमोद येवले,अमित खोकले आणि वाचक सभासद,पत्रकार रविंद्र जगताप आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचलन वाचनालयाचे सुरेश गोरे यांनी केले.सौ.भारती सावंत,कैलास साळगट,स्वाती मुळे यांनी मनोगत व्यक्त केले.ग्रंथपाल योगेश कोळगे यांनी आभार मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!