Homeकोपरगावनगरपालिकेने जनतेच्या तक्रार निवारण व सुविधेसाठी कायमस्वरूपी व्हाट्सअप नंबर व हेल्पलाइन, संगणक...

नगरपालिकेने जनतेच्या तक्रार निवारण व सुविधेसाठी कायमस्वरूपी व्हाट्सअप नंबर व हेल्पलाइन, संगणक प्रणाली तातडीने चालू करावी माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांची मागणी

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

        कोपरगाव नगरपालिकेने जनतेच्या तक्रार निवारण व सुविधेसाठी व्हाट्सअप नंबर व हेल्पलाइन,संगणक प्रणाली तातडीने कायम स्वरूपी चालू करावी अशी मागणी माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी तमाम नागरीकांचे हित लक्षात घेऊन केली आहे.

नगरपालिकेची निवडणुक पुढे ढकलण्यात आली असल्याने,
नगरपालिकेने जनतेच्या सुविधेसाठी आधुनिकता कायमस्वरूपी स्वीकारावी आमलात आणावी ही काळाची गरज असल्याचे मत श्री.पाटील यांनी मांडले आहे.
           मागील गेल्या दीड वर्षापासून नगरपालिकेचे इलेक्शन / निवडणुक झाली नाही,असूनही ती लांबले आहेत. तद्त पूर्वी नागरिकांना नगरपालिके संदर्भात आपापल्या वार्डातील *नगरसेवकांकडे* कुठल्याही प्रकारच्या सुविधेबाबतची तक्रार किंवा मागणी करता येत होती. मात्र,आत्ता ती करता येत नाही.समस्या मोठी असेल गंभीर असेल तर पूर्वी नगरसेवक तातडीने त्या विभागाच्या अधिकारी /कर्मचाऱ्यांना त्या  वॉर्डात घेऊन जात असत.

आता पाणीपुरवठा,अस्वच्छ पाणी,आरोग्य,रस्ते,गटारी,डासांसाठी औषध फवारणी,कचरा,मोकाट जनावरांविषयी तक्रारी,रस्त्यातील अडथळे, रस्त्यांवरील खड्डे,बांधकामा विषयी परवानगी,बांधकामाचे अतिक्रमणे, विविध प्रकारचे दाखले, जन्म -मृत्यू च्या नोंदी, इतर शहर विकासाचे विविध कामे यांसारखी अनेक कामे नगरपालिकेकडे असतात. प्रत्येक कामासाठी नागरिकांना नगरपालिकेत जावे लागते.तिथे बराच वेळ थांबावे लागते.ज्येष्ठ नागरिकांना माता -भगिनींना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो,कधी कधी अधिकाऱ्यांची/कर्मचाऱ्यांची भेट होईलच असे नाही, यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते व नागरिकांचा बहुमुल्य वेळ विनाकारण वाया जातो,त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो व गैरसोईला सामोरे जावे लागते.तसेच अधिकाऱ्यांचाही वेळ वाया जातो.जर
हाच वेळ अधिकाऱ्यांचा वाचला तर,ते शहर विकासाच्या कामासाठी जास्त वेळ देऊ शकतील व गावाची प्रगती होऊ शकते.अनेक वेळा नागरिकांनी दिलेले कामाच्या मागणीचा अर्ज ही सापडत नाहीत.असेही श्री.पाटील आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
यासाठी नगरपालिकेने तातडीने एक हेल्पलाइन नंबर कॉम्प्युटरराईड चालू करावा जेणेकरून ती तक्रार किंवा केलेली मागणी ही त्यात कायमस्वरूपी तारखेनिशी नोंद राहील. तसेच एक व्हाट्सअप नंबरही जाहीर करावा, जनतेला द्यावा जेणेकरून फोटोसह व नावासह त्या ठिकाणी तक्रार व्हाट्सअप वर पाठवता येईल जेणेकरून नागरिकांचा वेळ वाचेल व त्या व्हाट्सअप व संगणक प्रणाली नंबर वरच नगरपालिकेने केलेल्या कारवाईचे फोटो टाकावा आणि ते काम तातडीने मार्गी लावावे असा सल्ला माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगरपालिकेला दिला आहे.
पुढे ते म्हणाले,नगरपालिकेला नागरिक मोठ्या प्रमाणात कर/टॅक्स भरतात आणि हा कर स्वतःच्या कुटुंबाच्या सोयी सुविधेसाठीच ते देतात. भरलेल्या करातून नागरिकांना जीवनावश्यक सुविधा मिळाव्या यासाठीच व निष्कारण हेल्पटे मारून मनस्ताप सहन करावा लागू नये. यासाठी,म्हणून आता नगरपालिकेने थोडे आधुनिकतेकडे कायमस्वरूपी वळणे गरजेचे असल्याचे श्री. पाटील यांनी म्हटले आहे.
तरी निदान तातडीने ही सुविधा त्वरीत चालू करावी व प्रत्येक वॉर्ड मध्ये,मेन चौकात त्या नंबर चे फ्लेक्स लावावे व नागरिकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी नगरपालिकेकडे माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात शेवटी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!