स्वराज्य वार्ता न्युज,पोर्टल
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
मो.9675855271
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय मनाशी बाळगणारे व ग्रामीण भागातील पालकांचा विश्वास संपादन करणारी सिन्नर तालुक्यातील श्री कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे एकमेव स्कूल एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूल होय, शहा येथे शैक्षणिक वर्ष 2023- 24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.

” विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, हेच आमचे उद्दिष्ट “आणि “तिमिरातुनी तेजाकडे” या तत्त्वावर चालणारी सिन्नर तालुक्यातील शहा येथील एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलने मागील काही वर्षात पालकांचा व विद्यार्थ्यांचा भरघोस असा विश्वास संपादन करून आपली गुणवत्ता प्रस्थापित केली आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ही इच्छा मनात असणे वेगळे व प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणे वेगळे.एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूल प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा त्यांना चालना मिळावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन करत असते.

यामध्ये प्रामुख्याने वकृत्व स्पर्धांचे आयोजन करणे,मराठी,हिंदी,इंग्लिश विषयाचे काव्यवाचन स्पर्धा यांचे आयोजन करणे,विविध खेळांचे आयोजन करणे,शैक्षणिक सहल, सांस्कृतिक कार्यक्रम,वार्षिक स्नेहसंमेलन,शारीरिक विकासासाठी वर्षभर योगा,कराटे,शिवकालीन खेळ, विविध खेळांच्या स्पर्धा.तसेच संबंधित सर्व प्रकारांचे शिक्षण देणे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमतेची वाढ होण्यासाठी व त्याची मूल्यमापन वाढीसाठी अभ्यासक्रमावर आधारित चाचणी परीक्षा,मासिक चाचणी प्रकल्प, उपक्रम,गटचर्चा या सर्वांचे आयोजन करणे,व्यवसाय शिक्षण म्हणून मूर्ती कला,चित्रकला यांचे शिक्षण देणे यासारखे इतरही बाबींचे स्कूल नेहमी आयोजन करत असते.
त्याचप्रमाणे “विद्यार्थी हेच आमचे दैवत ” या तत्त्वावर चालत विद्यार्थ्यांना अध्यात्मिक ज्ञान,शैक्षणिक ज्ञान, शारीरिक खेळ असे सर्वोत्तम ज्ञान देण्यासाठी उच्च ज्ञान संपादित केलेला शिक्षक वृंद देखील या शाखेत काम करत आहे.

या सर्व घटकांच्या माध्यमातून स्कूल ने सिन्नर तालुक्यात लोकप्रियता मिळवली आहे पुढील 2023/2024या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश पत्र सुरू झालेली आहे, तरी पालकांनी आपल्या पाल्याचा फक्त विकास नाही तर सर्वांगीण विकास होण्यासाठी एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूलला आवश्यकता भेट द्यावी व आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा अशी विनंती स्कूलच्या मॅनेजमेंटच्या वतीने करण्यात आली आहे.