
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी अन्याय होत असलेल्या व अडचणीत असलेल्या महिलांना सदैव पोलिस मदत उपलब्ध असते,११२ नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन यांनी एका समारंभात व्यक्त केले.


सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान व कोरोना एकल महिला समितीच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कोरोना एकल महिलांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले होते.या प्रसंगी मंदावि नागरी सहकारी पतसंस्थेचे आशुतोष पटवर्धन,ज्ञानेश्वर वाकचौरे, अकोल्याच्या सौ.कुलकर्णी,सौ.वंदना चिकटे,झालटेताई,सौ उमा वहाडणे आदि मान्यवर उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक सौ संगिताताई मालकर यांनी केले.

पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी महिलांना मार्गदर्शन केले,सौ कुलकर्णी यांनी शासकीय योजनांची माहिती. ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी सुत्रसंचलन केले.समारंभासाठी शहर व तालुक्यातील विद्यार्थी,कोरोना एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.