Homeकोपरगावशेखर बोरावके यांची कोपरगाव शिवसेना ( ठाकरे गट) उपशहर संघटकपदी निवड

शेखर बोरावके यांची कोपरगाव शिवसेना ( ठाकरे गट) उपशहर संघटकपदी निवड

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच संपर्क प्रमुख बबनरावजी घोलप संपर्क प्रमुख शिर्डी लोकसभा मतदार संघ, शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमोद अण्णा लभडे, शहरप्रमुख सनी अण्णा वाघ,ग्राहक संरक्षन कक्ष रवी नाना कथले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून कोपरगाव उपशहर संघटकपदी शेखर बाळासाहेब बोरावके यांची नियुक्ती झाली आहे.

शेखर बोरावके हे कोपरगाव शहर शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक व धडाडीचे कार्यकर्ते असून पक्षप्रमुखाच्या आदेशानुसार पक्षाचा अजेंडा चालवणे,विविध सामाजिक उपक्रम राबविणे या कामी आपले योगदान दिले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर कोपरगाव उपशहर संघटक पदाची जबाबदारी सोपवली आहे .
पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती विश्वासाने पार पाडणार असल्याचे शेखर बोरावके यांनी म्हटले आहे

कोपरगाव उपशहर संघटकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!