Homeकोपरगावसंत महंतांच्या समवेत जेष्ठ नागरिक सेवा मंचची वार्षिक सभा संपन्न

संत महंतांच्या समवेत जेष्ठ नागरिक सेवा मंचची वार्षिक सभा संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव येथील प्रथीतयश उद्योजक, दानशूर व्यक्तीमत्व कै.भागचंद भाऊ ठोळे यांनी स्थापन केलेल्या जेष्ठ नागरिक सेवा मंचची तेवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सनदी लेखापाल अमरनाथ लोंगाणी यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून मंचच्या अध्यक्षा सौ.सुधाभाभी ठोळे यांनी व रजनीताई गुजराथी यांनी अहवाल वाचन केले.एस.एल कुलकर्णी यांनी आर्थिक लेखाजोखा मांडला.

या प्रसंगी शहरातील दोन आदर्श मातांचा यथोचित सन्मान करण्यात आला.आपल्या कार्याचा ठसा उमटविणा-या महिला डॉक्टर सौ.आचारी, सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.संगिताताई मालकर, शेती तज्ञ सौ.आढाव मामी आदींचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभात व्यासपीठावर मंचचे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले,कार्याध्यक्ष विजय बंब,उत्तम भाई शहा,वसंत तात्या आव्हाड,सौ.शैलजा रोहोम,ह. भ.प.थोरे महाराज,डॉ.दत्तात्रय मुळे,डॉ. विलास आचारी आदि मान्यवर उपस्थित होते.

यानिमित्ताने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज,

जेऊर कुंभारी येथील महानुभाव पंथाचे डॉ.यशराज महाराज यांनी आशिर्वाद दिले.


स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले.सुत्रसंचलन डॉ. विलास आचारी यांनी केले.

समारंभासाठी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे,उद्योजक कैलास ठोळे,माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील,माजी.नगरसेवक बबलु वाणी, मुंबादेवी तरुण मंडळ,साई गावपालखी सोहळ्याचे आयोजक,शहरातील सर्व डॉक्टर्स,उद्योजक,जेष्ठ नागरिक सेवा मंचचे सर्व सभासद,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब, सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत दाते, ठोंबरे यांनी जेष्ठ सेवा मंच ला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सत्कार सोहळ्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते तर शेवटी उत्तम भाई शहा यांनी आभार प्रदर्शन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!