Homeकोपरगावकै.ना.धो.महानोर यांना कोपरगाव शब्द गंध साहित्यिक परिषदेच्यावतीने वाहीली श्रद्धांजली

कै.ना.धो.महानोर यांना कोपरगाव शब्द गंध साहित्यिक परिषदेच्यावतीने वाहीली श्रद्धांजली

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव – जेष्ठ साहित्यिक,रानकवि कै.ना.धो.महानोर यांचं नुकतंच निधन झाले.साहित्य विश्वात एक पोकळी निर्माण झाली.साहित्य विश्वाची न भरणारी हि एक अनमोल जागा आणि एक अतुट नाते.

दुःखद अंतःकरणाने शब्द गंध साहित्यिक परीषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने स्व.र.म. परीख हिंदी तथा मराठी सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयाच्या वतीने श्रद्धांजलीचे आयोजन करण्यात आले होते.शब्द गंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष कवी कैलास साळगट,कार्याध्यक्ष प्रा.डॉ.संजय दवंगे,सौ. शैलजाताई रोहोम यांनी कै.ना.धो. महानोर यांच्या साहित्यावर चर्चा करून आठवणींना उजाळा दिला.कवी प्रमोद येवले यांनी स्वागत प्रास्ताविक केले.

ना.धो.महानोर यांच्या जन्मस्थान व पळसखेड येथील रानकविता, निसर्गाच्या सानिध्यात राहून आलेल्या कवितांवर आधारित चर्चा करण्यात आली कवी प्रमोद येवले यांनी अहमदनगर येथील सायबान मळा येथे झालेल्या साहित्य संमेलनात लाभलेला महानोरांचा सहवास आठवणी जाग्या केल्या.

जेष्ठ साहित्यिक रानकवि कै.ना.धो. महानोर यांच्या श्रद्धांजली निमित्ताने शब्द गंध साहित्यिक परीषद कोपरगाव शाखेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!