Homeकोपरगावआंचलगावचे उपसरपंच अशोक वाघ यांचा काळे गटातून कोल्हे गटात प्रवेश -युवा नेते...

आंचलगावचे उपसरपंच अशोक वाघ यांचा काळे गटातून कोल्हे गटात प्रवेश -युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व ज्येष्ठ नेते दत्तूनाना कोल्हे यांच्या हस्ते अशोक वाघ यांचा सत्कार

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव येथील उपसरपंच अशोक चिंधू वाघ यांनी आज मंगळवारी (८ ऑगस्ट) सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व ज्येष्ठ नेते दत्तूनाना कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हे गटात प्रवेश केला.यावेळी विवेकभैय्या कोल्हे व दत्तूनाना कोल्हे यांनी अशोक वाघ यांचे स्वागत केले.

यावेळी उमेश फकिरराव शिंदे,सोपान कारभारी शिंदे,सुभाष सखाराम शिंदे, भाऊसाहेब विश्वनाथ खिरडकर, भाऊसाहेब मुरलीधर शिंदे,गणपत भिकाजी शिंदे,संजय रंगनाथ शिंदे, निलेश रविकांत औटी आदींसह आंचलगाव व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपसरपंच अशोक वाघ म्हणाले,माजी मंत्री सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेले आहे.पाणी,शेती, सहकार,शिक्षण,सिंचन,आरोग्य,उद्योग क्षेत्रातील तसेच सहकारी संस्था, कष्टकरी शेतकरी,कामगार,लहान- मोठे व्यावसायिक आदींसह सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला.पाटपाण्याचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन सर्वसामान्य जनतेच्या सुख- दु:खात समरस होऊन काम करणारा कोल्हे परिवार हा अडचणीच्या काळात जनतेला मदत करण्यात सदैव पुढे असतो.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपच्या नेत्या व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे हे मतदारसंघातील जनतेचे व विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत.युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांना कोपरगाव मतदारसंघातील सर्व प्रश्नांची चांगली जाण असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रगल्भ नेतृत्वाची आज खरी गरज आहे.त्यामुळे आपण विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काळे गटाला सोडचिठ्ठी देऊन कोल्हे गटात प्रवेश केला आहे. यापुढील काळात आपण विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!