
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत क्रीडा परिषद अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी कुमार ओम गणेश सोमवंशी याने अंडर-१७.(७०-७५)किलो वजन गटात महाराष्ट्र राज्यात 3 क्रमांक मिळून घवघवीत यश संपादित करीत ब्रांझ मेडल पटकावले आहे.
ग्रामीण भागातील मुले -मुली ही शिक्षणाबरोबरच क्रिडा क्षेत्रामध्ये असलेल्या विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन गरूडझेप घेतल्याशिवाय राहत नाही हे एस.डी.जाधव इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी ओम गणेश सोमवंशी याने राज्यस्तरीय बॉविसंग स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवत ब्रांझ मेडल पटकावत भावी विद्यार्थ्यांसमोर एक असा आदर्श ठेवला कि, शहरातील विद्यार्थ्याप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा स्पर्धा परिक्षेत कोठेही कमी नाही. त्याच्या या यशाबद्दल श्री कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे,एस.डी.जाधव इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक

आदरणीय श्री संभाजी जाधव सर यांच्या हस्ते व सौ.शुभांगीताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच त्यास प्रशिक्षण देणारे शाळेचे क्रीडा

शिक्षक श्री.निवृत्ती मुरडणर सर यांचे प्राचार्य निळकंठ सर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यास भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संस्थेची संस्थापक मा.संभाजी जाधव सर,सौ शुभांगी जाधव, प्राचार्य मा.अतुल निळकंठ,क्रीडा शिक्षक निवृत्ती मुरडणर,वर्ग शिक्षक कैलास वर्पे,अनिल चतुर,सौ.निलोफर शेख,सौ.रूपाली निरगुडे,सौ.प्रियंका पगार,संदीप शिंदे,सुरेश पारधी,सौ.वर्षा उगले,सचिन जाधव,मुकुंद शिरसाट, प्रीतम जाधव,सचिन ठाकरे,सौ.भाग्यश्री जाधव,सौ.मनीषा वाणी,सौ.सुमन दत्ता,सौ.संगीता अस्वले,कु.प्रतीक्षा जाधव यांस सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक,विद्यार्थी आदि उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चतुर सर यांनी केले.