Homeनाशिकएस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहाने...

एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा

संपादक – राजेंद्र तासकर
सिन्नर तालुक्यातील शहा येथील एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इ१०वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठया दिमाखात व उत्साहात साजरा करण्याात आला.
या वेळी ससंस्थेचे अध्यक्ष श्री संभाजी जाधव सर, शहा गावच्या सरपंच सौ.शुभांगी जाधव मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री.नीलकंठ सर व इ.१०चे वर्गशिक्षक श्री वर्पे सर आणि सर्व शिक्षक -शिक्षिका व विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथीं म्हणुन संस्थेचे संस्थापक मा.श्री जाधव सरांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या जीवनातील अनुभव विशद करत सांगितले कि, जिवन एक संघर्ष आहे,संघर्षमय जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर,स्वतःचा स्वतःवरील आत्मविश्वास दृढ असला पाहिजे आत्मविश्वासाच्या बळावरच प्रत्येक जण आपले ध्येय गाठत असतो जीवनात ध्येय सोडले नाही तर निश्चितच यशाचे शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही आणि ते आपण गाठालच हिच संस्थेच्या वतीने भावी जीवनास शुभेच्छा त्याचबरोबर जो विद्यार्थी इयत्ता दहावीस ९०% टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त करेल( मिळवेल) त्यास संस्थेच्या वतीने रूपये पाच हजाराचे बक्षीस देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री.नीलकंठ सरांनी विद्यार्थ्यांना जीवन एक मोठी परीक्षा आहे तिला सामोरे जाताना कसे जावे या बद्दल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
याचबरोबर शाळेचे शिक्षक श्री. उगले एन.एन, सौ.नरोडे मॅडम ,श्री. शिंदे सर यांनी व इयत्ता दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कु. संस्कृती गाडे व कु.अस्मिता गलांडे यांनी केले व शेवटी शाळेचे शिक्षक श्री खेडकर टी. एम. यांनी आभार प्रदर्शन केले यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!