Homeकोपरगाव१३३ व्या जयंतीनिमित्त कुंभारी येथे भारतरत्न महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

१३३ व्या जयंतीनिमित्त कुंभारी येथे भारतरत्न महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : प्रत्येक भारतींयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनस्वी अभिमान असला पाहिजे,त्यांचे आचार आणि विचार इतके प्रगल्भ होते की, त्यामुळे सर्वांना समान न्याय व हक्क मिळाला अशा या भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना १३३ व्या जयंतीनिमित्त कुंभारी येथे बौध्द धर्मियांच्या वतीने व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गौतम बौद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करुन मोठ्या उत्साहात १४ एप्रिल रोजी विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे जेष्ठ नागरिक पाराजी आण्णा पवार हे होते,तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची वेशभूषा धारण करून नमन कदम या १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने ” मी आंबेडकर बोलतोय ” या विषयावर आंबेडकरांच्या शालेय जीवनाचा परिपाठ आपल्या मनोगतातून व्यक्त केला.त्याचबरोबर शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा या आंबेडकरांच्या तत्वानुसार त्यांच्या जयंतीच्या पर्वकाळावर MPSC, UPSC सारख्या उच्च शिक्षणाचा गावातील विद्यार्थ्यांना लाभ घेता यावा यासाठी गावातच पुस्तके उपलब्ध व्हावी म्हणून ग्रंथालयाची अपेक्षा प्रा.अतुल निळकंठ सर यांनी व्यक्त करताच त्यास ग्रामस्थांच्या वतीने हिरवा सिग्नल देण्यात आला. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी व ग्रामस्थांनी आपले मनोगत पर भाषण केले.

यावेळी विविध संस्थांचे,संघटनांचे आजी -माजी पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच,संचालक,महिला,बालगोपाल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल चंदनशिव सर यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार भगवान खळे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!