
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : -सिन्नर तालुक्यातील शहा सारख्या खेडे गावात मुलांच्या स्मरणात राहिल अशा पध्दतीचे उच्च शिक्षण देऊन संस्थापक अध्यक्ष मा. संभाजी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य निळकंठ सर यांच्या अथक प्रयत्नाने तसेच ज्ञानदान देणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांच्या सहकार्याने एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूलने विशेष नावलौकिक मिळविला असल्याचे मत सौ.शुभांगीताई जाधव यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवित यश संपादन केल्याबद्दल आमच्या प्रतिनिधीस बोलतांना मांडले आहे.
पुढे बोलतांना सौ.जाधव म्हणाल्या की,या शाळेत अनेक विद्यार्थी – विद्यार्थीनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी पुढे जाऊन शाळेचा व गावाचा नावलौकिकात भर घालत आहे.मुलांच्या कला,गुणांना वाव देण्यासाठी व सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी शाळेचा सर्व स्टाप अथक परिश्रम घेत असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.
एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूल चे सन 2023-2024साठी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत गौरोत्माक यश प्राप्त केलेले विद्यार्थी
5th standard.
1) सचिन ज्ञानेश्वर वाघ (164) 55.78%; 2) अथर्व दिपक शेलार (140) 47.61%; 3) वरुण सुरेश पारधी (118) 40.13%; 4) शुभम संतोष विघने (128) 45.53% ; 5)रणवीर सचिन थोरात (144) 48.97% तसेच
8th standard
१) क्रिष्णा विजय राहाणे (146) 48.99% ; 2) ऋतुजा सचिन थोरात (144) 48.32 % ; 3) साई प्रकाश चिने (138) 46.30 % ; 4) साईराज रविंद्र गावंड (128) 42.95% ; 5) ओम हरिश्चंद्र कोकाटे (152)51.00% 6) अभिजित प्रभाकर साळुंके (158) 53.00%.; 7) आनुष्का प्रसाद आहेर (128) 42.95% ; 8) प्रथमेश विजय घुमरे (130) 43.62 % वरीलप्रमाणे एस.डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून वरील सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहे.
पूर्व माध्यमिक व उच्च पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ह्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पूणे अंतर्गत घेण्यात आल्या आहे या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या या सर्वच विद्यार्थ्यांचे श्री कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री संभाजी जाधव सर तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.शुभांगी जाधव,शाळेचे प्राचार्य श्री निळकंठ सर,सर्व शिक्षक -शिक्षिका यांनी यशस्वी सर्वच विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने भरभरून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.