
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : तालुक्यातील मुर्शतपुर येथील श्रीमती रखमाबाई रामजी दवंगे (८९) यांचे मंगळवारी निधन झाले, त्यांच्या मागे दोन मुले,तीन मुली, सुना, जावई,नातवंडे असा परिवार आहे.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे परचेस ऑफिसर भाउसाहेब दवंगे यांच्या त्या मातोश्री तर यशवंत कुक्कुट पालन संस्थेचे अध्यक्ष देवराम गवळी यांच्या सासु होत. त्यांच्या पार्थीवावर मुर्शतपुर येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले.याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. धार्मिक मनमिळावु स्वभावाने त्या परिचित होत्या.कै.रखमाबाई दवंगे यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आदिंनी शोक व्यक्त केला.