
कोपरगाव : – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत एस एस सी परिक्षा होऊन त्याचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. सर्वच क्षेत्रामध्ये गावाचे नाव नेहमी चर्चेत असलेले तालुक्यातील कुंभारी हे गाव एस एस सी परिक्षेतही प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवून सावित्रीच्या लेकींनी बाजी मारल्याने चर्चेचा विषय बनला आहे. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डौ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.

गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयात प्रथम क्रमांक

कु. भारती श्रावणी वाल्मिक 89.20% ;

द्वितीय क्रमांक कु. पैठणे सिध्दी श्रीकांत 88.80% ;

तृतीय क्रमांक कु. बढे अनुष्का किरण 88.40% गुण मिळवून शाळेच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यर्थीनीनी पहिले तीन क्रमांक पटकविले आहे. सार्वजनिक वाचनालय कुंभारीच्या वतीने पेन, वही, शाल व पुष्पगुच्छ तसेच विलास त्र्यंबक कदम सर यांनी प्रत्येक विद्यार्थीनीस पाचशे रुपये रोख स्वरुपात देऊन मान्यवरांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थीनींना सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा. बागुल सर, विलासजी त्र्यं.कदम सर, सुनिलजी चंदनशिव सर,वाचनालयाचे अध्यक्ष रमणजी गायकवाड, सचिव यशवंतजी गायकवाड, उमंग प्रतिष्ठानचे धडाडीचे कार्यकर्ते व शिक्षण प्रेमी डॉ. सुयोगजी पवार, भाजपा चे कोपरगाव पश्चिम मंडल अध्यक्ष सुनिलजी कदम, प्रमोदजी चिने, पत्रकार राजेंद्रजी तासकर, सोसायटी नं. १ चे माजी. चेअरमन अरुणजी कदम, विशाल पैठणे, भाऊसाहेब पवार आदि ग्रामरथ उपस्थित होते.

कार्यकमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक बागुल सर यांनी सांगितते की,या विद्यालयामार्फत एस एस सी परिक्षेसाठी एकूण 46 विद्यार्थ्यानी फॉर्म भरलेले होते. मात्र, 45 विद्यार्थ्यानी परिक्षा दिली आहे. त्यापैकी 42 विद्यार्थी पास झाले असून, शाळेचा 93.33% निकाल लागला आहे. चालू 2025/26 वर्षी चा यापेक्षा जास्त टक्केवारी वाढविण्यास अधिक उपाययोजना आखून भर देणार. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील शिक्षणास शुभेच्छा. त्याचबरोबर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थीनींना भावी वाटचालीस प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने त्यांचा जो सत्कार करण्यात आला तो निश्चितच त्यांच्या चिरकाल स्मरणात राहिल व त्यातून त्यांना उभारी मिळेल. वाचनालयाच्या वतीने घेण्यात येत असलेले उपक्रम हे खरोखर कौतुकास्पद असल्याचेही गौरोद्गार त्यांनी शेवटी काढले. याच बरोबर डॉ.पवार, कदम सर, चंदनशिव सर यांसह सत्कारमुर्ती

कु. श्रावणी भारती व सिध्दी पैठणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष रमणजी गायकवाड यांनी मांडले तर सुत्रसंचालन चंदनशिव सर यांनी केले व शेवटी उपस्थितांचे आभार वाचनालयाचे सचिव यशवंत गायकवाड यांनी मानले.
या गुणवंत विद्यार्थीनीवर पंचक्रोशिजून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .