
कोपरगांव : – महाराष्ट्र शासन अनुदानित आयुर्वेद युनानी महाविद्यालयीन अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत एनसीआयएसएम नवी दिल्ली, आयुष्य संचालनालय मुंबई, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, आणि एमसीआयएम मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी आत्मा मालिक ध्यानपीठ येथे “आयुर्वेद युनानी: सिनर्जिस्टिक सायन्स फॉर हॉलिस्टिक हेल्थ” या विषयावर राष्ट्रीय सेमिनार २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर संघटना ही राज्यस्तरीय शासन अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील अध्यापकांनी सन २००५ मध्ये स्थापन केलेली असून सदर संघटना ही २०११ मध्ये अधिकृत नोंदणी शासन स्तरावर झालेली आहे सदर संघटनेचे मुख्यालय मुंबई येथे असून त्याच्या शाखा १६ अनुदानित आयुर्वेद महाविद्यालय व तीन युनानी महाविद्यालयात सुरू आहेत सुमारे ३५० अध्यापक सदस्य म्हणून नोंदणी झालेली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. सुरेश पोघाडे यांनी दि. 26 /09 /2025 रोजी दिली. यावेळी आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.
सदर सेमिनारच्या उद्घाटन कार्यक्रमास उद्घाटक म्हणून माननीय नामदार प्रतापराव जाधव आयुष केंद्रीय मंत्री, नवी दिल्ली. प्रमुख अतिथी माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब आणि अध्यक्ष म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तसेच कार्यक्रमास माननीय आमदार आशुतोष दादा काळे, माननीय आमदार संग्राम भैय्या जगताप, माननीय आमदार संजय कुटे, माननीय आमदार किरण लहामटे, माननीय आमदार डॉक्टर ज्योती गायकवाड, माननीय आमदार किशोर दराडे, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माननीय आमदार सुधाकरराव अडबले, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, तसेच माननीय लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर मॅडम, कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, डॉक्टर रमण घुंगरालेकर सर, संचालक आयुष्य, माननीय डॉक्टर मिलिंद आवारे सर, अधिष्ठाता आयुर्वेद विद्या शाखा व प्रतिकुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ हे उपस्थित राहणार आहेत.
या सेमिनारमध्ये डॉक्टर नारायण जाधव सर, अध्यक्ष मार्बिझम एनसीआयएसएफ नवी दिल्ली हे “हक्क कर्तव्य व वैद्यकीय नीती” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर माननीय डॉक्टर गोपाकुमार सर हे कुलसचिव, थ्रिसुर केरला विद्यापीठ. “त्वचारोगावर” मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर पद्मनाथ केसकर, आपत्ती वैद्यकीय व्यवस्थापक, रुबी हॉल पुणे हे “आपत्ती व्यवस्थापन व दैनंदिन वैद्यकीय व्यवसाय” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच डॉक्टर जगन्नाथ दीक्षित, प्राध्यापक स्वस्थवृत्त सामाजिक औषधे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे हे “स्थौल्य व मधुमेह” या व्याधीमध्ये “दीक्षित जीवनमान पद्धतीचा उपयोग” या विषयावर आपले विचार प्रकट करणार आहेत. डॉक्टर श्रीनिवासुलू हे “आम” या संकल्पनेवर जीवनशैलीमध्ये सहभाग स्पष्ट करणार आहेत. तर बेंगलोर येथील डॉक्टर हमीदुद्दीन हे आपला विषय मांडणार आहेत.
त्याशिवाय सेमिनारमध्ये विविध प्रकारचे औषधी कंपन्या पुस्तक प्रकाशक हे स्टॉल लावणार आहे. तसेच विद्यार्थी अध्यापक हे सेमिनार मध्ये संशोधन पेपर पोस्टर मॉडेल सादर करणार आहेत. तसेच गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय अहिल्यानगर यांचे मार्फत “विविध आयुर्वेद वन औषधी वनस्पतींचे” प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. सदर सेमिनारसाठी डॉक्टर दिलीप वांगे प्रबंधक एमसीआयएम, डॉक्टर श्रद्धा सुडे सहाय्यक आयुष संचालक मुंबई, डॉक्टर अनिता कोल्हे सहाय्यक आयुष संचालक पुणे, डॉक्टर धनंजय हांगे सहाय्यक आयुष संचालक नागपूर व आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी आणि त्यांचा संपूर्ण कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
सदर सेमिनार यशस्वीतेकरिता माननीय डॉक्टर अभय पाटकर- आ. से. संघ आयुर्वेद महाविद्यालय, नाशिक. अध्यक्ष शासकीय अनुदानित आयुर्वेद महाविद्यालय संघटना, डॉक्टर मुकेश शुक्ला- के. जी. मित्तल आयुर्वेद महाविद्यालय, मुंबई, सचिव, डॉक्टर सुरज एल. ठाकूर- गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, अहिल्यानगर, कार्याध्यक्ष, डॉक्टर सुरेश पोधाडे- श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय, गुरुकुंज आश्रम, कोषाध्यक्ष तसेच ऑर्गनायझिंग कमिटी चेअरमन डॉक्टर सुरज एल. ठाकूर व ऑर्गनायझिंग कमिटी सचिव डॉक्टर प्रवीण पेटे- आयुर्वेद महाविद्यालय, सांगली तसेच इतर सदस्य व सर्व आयुर्वेद व युनानी महाविद्यालयाचे शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.