
कोपरगाव :- तालुक्यातील मंजुर येथील बिजलाबाई नरहरी तिरसे (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली नातवंडे, पंतवंडे असा मोठा परीवार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे माजी संचालक नरहरी सावळेराम तिरसे यांच्या त्या पत्नी तर संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कर्मचारी दत्तात्रय नरहरी तिरसे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आदींनी शोक व्यक्त केला.