
कोपरगाव :- सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना व्हाइस चेअरमन पदी मा.श्री. ज्ञानेश्वर (बापु) भगवंतराव परजणे साहेब यांची २२ जानेवारी रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे निकटवर्तीय संजीवनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. राजेंद्र परजणे साहेब, भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री. मुकुंद मामा काळे, संवत्सर ग्रामपंचायत सदस्य श्री. महेशजी परजणे व त्यांचे सहकारी, मित्र परीवार यांनी संवत्सर येथील कृषी मित्र सेवा केंद्र येथे शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन पेढे वाटप करून यथोचित सत्कार केला.

यावेळी संजीवनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. राजेंद्र परजणे साहेब, भाजपा दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मा. श्री. मुकुंद मामा काळे, संवत्सर ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. महेशजी परजणे, श्री. चिमाजी दैने, श्री. योगेशजी परजणे, सौ. छायाताई मुकुंदमामा काळे, श्री. रीतेशजी परजणे, श्री. सोमनाथजी परजणे, श्री. दिलीप कासार, श्री. दीनेश बोरनारे, श्री. संदीप मैंद, श्री. संचिन शेटे, श्री. संतोषजी कासार व चि. शंकरराव पुंड यांसह आदिंनी सत्कार करून सामाजिक, राजकीय भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना व्हा. चेअरमन परजणे साहेब म्हणाले कि, माजी. सहकारमंत्री स्वर्गवासी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब यांचा संवत्सर गावासह आमच्या परजणे कुटुंबावर विशेष प्रेम व जिव्हाळा होता, साहेबांच्या सहवासात मला सहकारातील जे बाळ कडु मिळाले ते माझ्या चिरकाळ स्मरणात राहील, त्याच बरोबर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा. श्री. बिपीनदादा कोल्हे साहेब, कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई कोल्हे तसेच सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे यांनी माझी कारखान्याच्या व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड करून मला सहकारात जोमाने काम करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी प्रथम कोल्हे कुटुंबियांचे आभार व्यक्त करतो व माझ्यावर सोपविलेले दायित्वाचा मी स्वीकार करतो.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर पंचक्रोशिसह सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.