Homeकोपरगावअमृत संजीवनी शुगरकेन संस्थेस खोटा धनादेश दिल्याप्रकरणी उसतोड वाहतुक कंत्राटदारास एक वर्ष...

अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेस खोटा धनादेश दिल्याप्रकरणी उसतोड वाहतुक कंत्राटदारास एक वर्ष कारावास व १२ लाख ३० हजार दंडाची शिक्षा.

कोपरगांव :- तालुक्यातील शिंगणापुर येथील अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेस भगवान दत्तु हिवर्डे (खिर्डी- खुलताबाद) यांनी खोटा धनादेश दिल्याप्रकरणी त्यांना कोपरगांव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संजय छ. खैरनार यांनी एक वर्ष कारावास व १२ लाख ३० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील शिंगणापुर येथील अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याकरीता उसतोड व वाहतुक करून कारखाना स्थळापर्यंत उस पोहोचविण्यांचे काम करते. उसतोड वाहतुक कंत्राटदार भगवान दत्तु हिवर्डे (रा. खिर्डी, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) याने २०१९.२० चे गाळप हंगामात अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेस उसतोड वाहतुकीचा करारनामा करून त्यापोटी उचल रक्कम स्विकारली. मात्र भगवान दत्तु हिवर्डे यांनी कराराप्रमाणे वर्तन केले नाही व त्यांचेकडील थकीत रक्कमेपोटी कंपनीस धनादेश दिला. आरोपीने फिर्यादीस खोटा धनादेश देवुन त्याचा अनादर घडवुन फिर्यादी कंपनीची फसवणुक केली म्हणून फिर्यादी कंपनीचेवतीने विजय पंढरीनाथ नरोडे यांनी भगवान दत्तु हिवर्डे यांचे विरूध्द कोपरगांव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात फौजदारी खटला कमांक १८९/ २०२१ दाखल केला होता. त्याची न्यायमुर्ती श्री. संजय छ. खैरनार यांच्यासमोर वेळोवेळी सुनावणी होवुन त्यात कंत्राटदार भगवान दत्तु हिवर्डे यांना न्यायमुर्तीनी एक वर्षे कारावास व १२ लाख ३० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास चार महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने दंडाची रक्कम १० जून २०२६ पर्यंत भरावयाची आहे असे यात निर्देश दिले आहे. सदर खटल्यास फिर्यादीच्यावतीने विधीज्ञ अशोकराव दगडुजी दुपके यांनी कामकाज पाहिले तर त्यांना विधीज्ञ माधुरी काटे यांनी सहकार्य केले. या निकालामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!