Homeकोपरगावकोपरगांव येथे ब्राह्यण सभेच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्तानं पालखी व शोभा...

कोपरगांव येथे ब्राह्यण सभेच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्तानं पालखी व शोभा यात्रेचे आयोजन

संपादक -राजेंद्र तासकर

ब्राह्मण सभा कोपरगावच्या वतीने सालाबाद प्रमाणे भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला.
कोरोनाच्या नंतरच्या पाश्वभुमीवर भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा निमित्तानं कोपरगांव शहरात सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन मोठ्या स्वरुपात करण्यात आले.या मध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ब्राह्यण सभेच्या मंगल कार्यालयात ब्राह्यण सभेचेअध्यक्ष श्री.मकरंद को-हाळकर व त्यांच्या पत्नी सौ.सुनिता को -हाळकर यांचे हस्ते भगवान परशूरामाचे पुजन विधीवत करण्यात आले.
शोभायात्रेचे सुरुवातीला सर्वाचे स्वागत ब्राह्यण सभेचे सचिव श्री.सचिन महाजन यांनी केले.उपाध्यक्ष श्री.राजेंद्र जवाद यांचे हस्ते संगमनेर येथिल प्रा. सतिष देशपांडे यांनी लिहिलेले भगवान परशूराम यांचे जीवन चरीत्राचे पुस्तक ब्रम्हतेज व परशूराम स्तवन आणि नंदुरबार येथिल उदय जोशी यांनी प्रायोजित केलेल्या भगवान परशूराम प्रतिमेचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे पौरोहीत्य वेदशात्र संपन्न वैभव जोशी व त्यांच्या सहकारी यांनी केले. त्यानंतर सभेच्या विविध उपक्रम व मंगल कार्यालयाचे माहीती प्रसाद नाईक यांनी करुन दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.प्रारंभी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे हस्ते भगवान परशुरामाचे पुजन करुन शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.या शोभायात्रेत लहान मुलांच्या विविध वेषभुजा खुप भावुन गेल्या यात रेणुका माता, भगवान परशूराम,संत ज्ञानेश्वर व मुक्ताबाई,आदीचा समावेश होता.ब्राह्यण समाज महीला मंडळाने पारंपारीक नऊवारी साडीत शोभा यात्रेत अग्रस्थानी राहुन प्रतिनिधित्व केले.गावातील रेणुका माता देवीच्या मंदीरा मध्ये आमदार श्री.आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते रेणुका मातेची व भगवान परशूरामाची आरती करण्यात आली.
नंतर या शोभायात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज पुतळया जवळ झाला.शोभा यात्रेचा समारोप करतांना कोपरगांव शहराचे पोलीस निरीक्षक श्री.वासुदेव देसले यांनी सर्वानी नियम व अटीचे पालन करुन शिस्तबद्ध शोभायात्रेचे आयोजन केल्या बद्दल समाजाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला गोदावरी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,जेष्ठ सदस्य श्री. सुधाप्पा कुलकर्णी,अॕड.जयंत जोशी,जेष्ठ पत्रकार मनोज जोशी,प्रा.अविनाश घैसास आदि या प्रसंगी उपस्थित होते.ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष श्री. बी. डी. कुलकर्णी यांनी आभार मानले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन खजिनदार जयेश बडवे यांनी केले.तर शोभा यात्रेचे संयोजन श्री.संजीव देशपांडे व संघटक श्री.महेंद्र कुलकर्णी यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्यण समाज महीला मंडळाच्या कार्याध्यक्ष अॕड.सौ.श्रध्दा जवाद,श्री. वसंतराव ठोंबरे,डाॕ.मिलींद धारणगांवकर,श्री.संदीप देशपांडे, अजिंक्य पदे,गौरीश लव्हरीकर, योगेश कुलकर्णी,सदाशिव धारणगांवकर,आदी पदाधिकारी समाज बांधव यांनी विशेष प्रयत्न केले.या शोभायात्रेत बहुसंख्य पुरुष व महीला समाज बांधव भगवे फेटे परिधान करुन असल्याने सगळे वातावरण भगवेमय झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!