Homeकोपरगावजनहित ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या वतीने कार्यकर्ता स्वयंप्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

जनहित ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या वतीने कार्यकर्ता स्वयंप्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

संपादक -राजेंद्र तासकर
जनहित ग्रामीण विकास व संशोधन संस्था पुणतांबा यांच्या वतीने कार्यकर्ता स्वयं प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी संस्थेचे संजय जोगदंड,व्यवस्थापिका स्वाती पटारे,सौ.जमधडे,सामाजिक कार्यकर्ते काळे उपस्थित होते.
सदर संस्थेस हेमचंद्र भवर यांनी डॉ.दादासाहेब गलांडे लिखीत व शेख मिराब‌क्ष खुदाबक्ष लिखीत ग्रंथ भेट म्हणुन दिले व संस्थेच्या सेवाभावी कार्यास व भावि वाटचालीस मनापासून भरभरून शुभेच्छा दिल्या.
जनहित ग्रामीण विकास व संशोधन संस्था पुणतांबा यांनी
ग्रामीण भागातील सर्व घटकांना सामावून घेत विकासाची गंगा आणण्यासाठी धडपडणारी संस्था व गोरगरिब विद्यार्थी विद्यार्थीनी, आजारी रुग्ण यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळविला असून या संस्थेच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण,ब्युटीपार्लर, कार्यकर्ते प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली जाते.
त्याचबरोबर कोरोना एकल महिला,परितक्ता,पालक नसल्याने शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य या संस्थेच्या

माध्यमातून केले जाते,तसेच संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना आदी उपक्रमांची माहिती दिली जाते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय जोगदंडआपली मेहनत पणाला लावतात,एवढेच नव्हे तर शासकीय अधिकारी यांना भेटून गोरगरीब जनतेसाठी सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने मदतीचा हात दिला जातो.या संस्थेच्या माध्यमातून आजतागायत अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची दारे दाखविली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!