
राष्ट्रीय स्तरावर काम करणा-या भारतीय शुगर या संस्थेने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची चालु वर्षाकरीता बेस्ट इनोव्हेटीव्ह शुगर प्लॅन्ट’ या पारितोषकासाठी निवड केल्याचे पत्र प्रेसिडेंट विक्रमसिंह शिंदे व चीफ ऑपरेटींग ऑफिसर संग्रामसिंह शिंदे यांनी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांना प्रदान केले,यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे ,कार्यकारी संचालक बाजीराव जी.सुतार,व सर्व संचालक उपस्थित होते.
संपादक -राजेंद्र तासकर
माजीमंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाने देश पातळीवर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने नावलौकीक प्राप्त केला असून राष्ट्रीय स्तरावर काम करणा-या भारतीय शुगर या संस्थेने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची चालु वर्षाकरीता बेस्ट इनोव्हेटीव्ह शुगर प्लॅन्ट' या पारितोषकासाठी निवड केल्याची माहिती सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे साहेब यांनी दिली.सदरचे पारितोषक म्हणजे स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांचा विचारांचा वारसा आणि सर्व ज्ञात-अज्ञात ऊस ऊत्पादक सभासद,शेतकरी,कष्टकरी, कारखाना व्यवस्थापन,कामगार, हितचिंतक,शेतमजुर,व्यापारी आदिंचे अनमोल सहकार्याचा परिपाक असल्याचेही ते म्हणाले.
त्यांनी पुढे म्हटले आहे की,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने आजवर राज्य व देशपातळीवर विविध २१ पारितोषके मिळविली असून भारतीय शुगरच्या राष्ट्रीय पारितोषकामुळे कोल्हे कारखान्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.सदर पारितोषकाची निवड देशातील सहकारी साखर कारखानदारी मधुन केली जाते.सन २०२२ या वर्षाकरिता भारतीय शुगरच्या टीमने संपूर्ण देशातील सहकारी साखर कारखान्याचा अभ्यास करून सहकारी तत्त्वावरील इनोव्हेटीव्ह प्लॅन्ट' म्हणून सहकारमहर्षी कोल्हेकारखान्याची निवड केली आहे असे बिपिनदादा कोल्हे साहेब यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, इफिसिएंट सल्फरलेस शुगर,को जनरेशन,डिस्टीलरी,लिकर, अॅसिटीक ॲसिड,अॅसिटीक अनहैड्राईड,इथाईल अॅसिटेट, बायो एनर्जी,बायो कंपोष्ट,रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे अंतिम टप्प्यामधील पॅरासिटामॉल,ट्राय इथाईल ऑर्थोफॉरमेट (टीईओ), ई.एम.एम.ई.हे बारा उपपदार्थाचे निकष या निवडीसाठी विचारात घेण्यात आले आहेत,अशा प्रकारे साखरेबरोबरच अन्य १२ उपपदार्थ निर्मीती करणारा देशातील सहकारी साखर कारखानदारीमधील एकमेव सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना ठरला आहे.त्यामुळेच आपणास राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखानदारीतील 'ओव्हरऑल बेस्ट इनोव्हेटीव्ह प्लॅन्ट' म्हणून पारितोषक जाहिर झाले आहे असेही त्यांनी सांगितले.
स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी आतापर्यंत सहकारी साखर कारखानदारीत वेगवेगळे अनेक प्रयोग यशस्वी करून दाखविले आहेत.वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट व नॅशनल हेवी इंजिनियरींग इत्यादी सहकारी साखर कारखानदारीशी संबंधित आंतरराष्ट्रीय व देशपातळीवरील संस्था उभारणी करीत असतांना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखानदारीत संशोधन आणि विकास या आवश्यक बाबीं निरंतर चालु ठेवल्या व त्यायोगे हे पारितोषक त्यांचे पश्चात मिळणे म्हणजे स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांनी केलेल्या कामाचे व योगदानाचे फलीत असल्याचे मत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक,साई संजीवनी बँकेचे अध्यक्ष व कोल्हे कारखान्याचे संचालक विवेकभैय्या कोल्हे साहेब यांनी व्यक्त केले.
तसेच या पारितोषकामुळे संजीवनी उद्योग समुहाचा व देशातील सहकारी संस्थांचा लेखाजोखा भारतीय शुगरने राष्ट्रीय स्तरावर नेण्यांचे काम केले असे मत कोपरगांव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे वहिनी यांनी व्यक्त केले.
सदरचे पारितोषक हे जून २०२२ महिन्याचे शेवटच्या आठवडयात पुणे येथे एएनएसआय कानपूरचे संचालक प्रा.नरेंद्र मोहन व साखर आयुक्त मा.शेखरजी गायकवाड साहेब (भा.प्र.से.) व भारतीय शुगरचे सर्व पदाधिकारी व अधिकारी तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे सर्व मान्यवर संचालक यांचे उपस्थितीत प्रदान केले जाणार असल्याची माहिती भारतीय शुगरचे प्रेसिडेंट विक्रमसिंह शिंदे व चीफ ऑपरेटींग ऑफिसर संग्रामसिंह शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
या पारितोषकाची घोषणा केली त्यावेळी कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे साहेब, संचालक विवेकभैय्या कोल्हे साहेब,उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे,कार्यकारी संचालक बाजीराव जी.सुतार,संचालक सर्वश्री.अरूणराव येवले, संजयराव होन,मनेष गाडे, सोपानराव पानगव्हाणे, शिवाजीराव वक्ते,विलासराव वाबळे,राजेंद्र कोळपे,ज्ञानेश्वर परजणे,फकिरराव बोरनारे, अशोकराव औताडे,प्रदिप नवले, मच्छिंद्र लोणारी,वेणुनाथ बोळीज, संगिता नरोडे,सोनुबाई भाकरे, बाळासाहेब नरोडे,अशोकराव भाकरे,साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे,सचिव तुळशीराम कानवडे,एच.आर. मॅनेजर प्रदिप गुरव यांच्यासह सर्व खातेप्रमुख,उपखातेप्रमुख आदि उपस्थित होते.