

संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव,
माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर,शिक्षण संस्थेचे सिन्नर भूषण सूर्यभानजी गडाख प्राथमिक विद्यालय,पंचाळे विद्यालयात बुधवारी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.सूर्यभानजी [नानासाहेब] गडाख यांची प्रतिमा गुरूस्थानी ठेवून प्रथम पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
सन्माननीय सेक्रेटरी राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनातून सुरु असलेल्या या विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थेच्या वतीने शिक्षकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.शिक्षक वृंद करत असलेल्या ज्ञानदानाच्या निस्पृह कार्यासाठी सन्माननीय राजेश गडाख सर यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा व धन्यवाद देण्यात आले.
प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांसाठी पेन,रुमाल, गुलाबपुष्प देऊन,शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत आई – वडीलांनंतर उच्च पदापर्यंत शिक्षण देणाऱ्या गुरुजनांप्रती विद्यार्थ्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शांताबाई शिंदे,ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक आर.एस.गडाख,उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक गोरक्षनाथ जगताप,विश्वनाथ शिरोळे,प्रवीण शेलार,शुभम गडाख यांनी उपस्थित राहुन कार्यक्रमातील आनंद व्दिगुणीत केला.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नवनाथ थोरात, उपशिक्षिक विनायक पगार, अमोल व्यवहारे,नलिनी लोखंडे, मयुरी हिवरडे,शितल नाजगड, अंजली डुंबरे,पूजा जगदाळे आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.