Homeनाशिकसिन्नरएस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात संपन्न

एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात संपन्न

संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव,

21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी 21 जून 2O15 पासून आंतरराष्ट्रीय योग दिनाला सुरूवात केली.या निमित्ताने एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कुलच्या प्रांगणात मुलांना दररोज सहज करता येईल असे अनेक प्रकारचे योगासने घेऊन योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

       यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री संभाजी जाधव सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले कि,आपले शरीर निरोगी व सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने दररोज योगासने केली पाहिजे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री नीलकंठ ए.एस यांनी विद्यार्थ्यांना योगा चा इतिहास योग साधनेचे महत्त्व व महती थोडक्यात पटवून सांगितली यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी योगा करून हा दिवस साजरा केला. तसेच शाळेत दर बुधवारी विद्यार्थ्यांना वेगवेगळी योगासने शिकवली जातात.
  आजचा हाआंतरराष्ट्रीय योगा दिन योगगुरु श्री तुषार सिसोदिया यांच्या नेतृत्वाखाली संपन्न करण्यात आला.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!