

संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 26 जून 2022 रविवार रोजी शिक्षकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेसाठी edac कंपनीचे प्रशिक्षक श्री विकास सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी संस्थेचे संस्थापक श्री संभाजी जाधव सर यांनी काळानुरूप शिक्षण प्रणालीत होणारे बदल व उच्च गुणवत्ता असलेली शिक्षण विद्यार्थ्यांना कसे देता येईल याविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री निळकंठ सर यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षण किती महत्त्वाचे असते या विषयी माहिती सांगितली,यावेळी शाळेचे सर्व शिक्षक आवर्जून उपस्थित होते.