


संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव,
स्व.सूर्यभानजी (नानासाहेब) गडाख यांच्या आशीर्वादातून व माननीय राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनातून सुरू असलेल्या
पंचाळे येथील सिन्नरभूषण सूर्यभानजी गडाख शैक्षणिक महाविद्यालयाने देवशयनी एकादशी निमित्ताने भव्य वारकरी दिंडी सोहळा वार शनिवार दिनांक 9 जुलै 2022 रोजी आयोजित केला.सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी वारकरी पोशाख परिधान करून हा सुख सोहळा स्वर्गी नाही याची दिंडीत सामील होऊन अनुभूती घेतली.संतांची अभंग, भजने टाळ मृदुंगाच्या साथीने गात गात संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली.सुशोभिवंत पालखी व रथामध्ये श्री विठ्ठल प्रतिमा व ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी गवळणी, अभंग,भारुडे सादर करून आनंदाचे डोही आनंद तरंग अशी भाव अवस्था अनुभवली. विद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री कोकाटे हिने कीर्तनाची एक झलक सादर करून उपस्थितांचे मने जिंकले.पंचाळे,शिंदेवाडी, धनगरवाडी भजनी मंडळ, ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंचाळे यांनीही या दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.प्राध्यापक गोरख जगताप,नामदेव गुरुळे,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम,आर.एस.गडाख, विश्वनाथ शिरोळे,कहांडळ राधाकिसन,शेलार प्रवीण,पवार विलास,गायकर बेबी मॅडम, निकम माधुरी मॅडम,खताळे सर,शिंदे सर,ठोक सर,खुळे सर, विनायक पगार,लोखंडे नलिनी, हीवरडे मयुरी,तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोसावी सर व इतर शिक्षक तसेच सरपंच,उपसरपंच, सदस्य,पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात दिंडी सोहळा पार पडला.