
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
राहुरी येथील गँलँक्सी निसर्गोपचार केंद्र यांचे वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिव्यांगांच्या सुख,दु:खांची जाणीव असणारे,दिव्यांगांच्या सहकार्यात पाठीशी तन,मन,धनाने आपुलकीने उभे असणारे डाँ.तन्वीर देशमुख यांचा राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने दि. ४ जानेवारी २०२३ रोजी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जीवन यशोदाई, भरभराटीच्या, दिव्यांग प्रती असाच स्नेह वृध्दींगत होवो अशा स्वरुपाच्या शब्दसुमनाच्या हार्दीक शुभेच्छा देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,डॉ तन्वीर देशमुख हे दिव्यांगासाठी कायमच सामाजिक उपक्रमात सहभागी असतात, ते नेहमी सहकार्य करतात दिव्यांगांच्या उपचारासाठी सवलत देतात त्या बद्दल प्रहार संघटने च्यावतीने त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
सत्काराला उत्तर देतांना डाँ. देशमुख म्हणाले कि,मी सदैव दिव्यांगा प्रती सेवेशी एकनिष्ठ असणारच तसेच नवीन वर्षाच्या शुभ मुहुर्तावर दिव्यांगांसाठी सर्व सेवेत 50 % सवलतीच्या दरात सेवा या विषयी मार्गदर्शन केले.त्याचबरोबर हॉस्पिटलला येताना दिव्यांग पेशंटनी दिव्यांग प्रमाणपत्र किंवा युनिक कार्डची झेरॉक्स सोबत येताना आणावी असे तालुकाध्यक्ष योगेश लबडे यांनी सांगीतले.

नुकतेच श्री क्षेत्र तिरुपती बालाजींची यात्रा करून सर्व दिव्यांगांना आनंदी रहाण्याचा आशीर्वाद घेवून आलेले आपल्या सुमधूर वाणीने निवेदक म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नावाजलेले मा.श्री.बच्चुभाऊ कडूंचे समर्थक राहुरी तथा अ.नगर प्रहार दिव्यांग संघटनेची बुलंद तोफ जिल्हा समन्वयक मा.श्री.आप्पासाहेब ढोकणे यांचा गँलँक्सी निसर्गोपचार केंद्र,तथा राहुरी तालुका प्रहार दिव्यांगसंघटनेच्या वतीने डाँ.देशमुख यांचे हस्ते शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अ.नगर (उत्तर) जिल्हा प्रमुख मधुकर घाडगे,अ.नगर जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे,राहुरी ता.प्रहार दिव्यांग संघटना अध्यक्ष योगेश लबडे,राहुरी ता.प्रहार दिव्यांग संघटना तालुका संपर्क प्रमुख रविंद्र भुजाडी,राहुरी तालुका सल्लगार सलीम भाई शेख, ता.प्रहार दिव्यांग संघटना सचीव दत्ता खेमनर,राहुरी ता.प्रहार दिव्यांग संघटना संघटक भास्कर दरंदले,राहुरी शहर उपाध्यक्ष जालिंदर भोसले,राहुरी शहर सचीव जुबेर मुसानी,मोरे सर,गँलँक्सी निसर्गोपचार केंद्र सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.