
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
राहुरी येथे अंध व्यक्तींसाठी शैक्षणिक क्षेत्रात जीवनाची ढाल,अर्थात ब्रेल लिपिचे संशोधक मा.लुई ब्रेल यांना जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून शब्दसूमनासह अभिवादन दि.४ जानेवारी २०२३रोजी करुन,राहुरी बिरोबा नगर येथील अंध युवक संगीत विशारद चेतन मोरे यांचा राहुरी ता.प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने श्रीफळ,शाल,पुष्पगुच्छ,शुभेच्छा देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चेतन मोरे यांनी ब्रेल लिपि वाचन प्रात्यक्षिक करुनआपले विचार प्रदर्शित केले.राहुरी ता.संपर्कप्रमुख रविंद्र भुजाडी यांनी लुई ब्रेल व ब्रेल लिपी विषयी थोडक्यात माहती देवून,अंधांच्या जिवनातील येणाऱ्या समस्या व त्यावर करण्यात देणाऱ्या उपाय योजना,ब्रेल लिपिचा जीवनात होणारा जादूच्या छडीसारखा वापर याविषयी सर्वांशी चर्चासत्र करून संवाद साधला.
याप्रसंगी अ.नगर (उत्तर) जिल्हा प्रमुख मधुकर घाडगे,अ.नगर जिल्हा समन्वयकआप्पासाहेब ढोकणे,राहुरी ता.प्रहार दिव्यांग संघटना अध्यक्ष योगेश लबडे,राहुरी ता.प्रहार दिव्यांग संघटना तालुका संपर्क प्रमुख रविंद्र भुजाडी,राहुरी ता.प्रहार दिव्यांग संघटना सचिव दत्ता खेमनर,राहुरी ता.प्रहार दिव्यांग संघटना संघटक भास्कर दरंदले,राहुरी शहर उपाध्यक्ष जालिंदर भोसले,राहुरी शहर सचिव जुबेर मुसानी उपस्थित होते.
शेवटी आभार दादासाहेब मोरे सर यांनी मानले.